Myra Vaikul
Myra Vaikul Saam Tv

Myra Vaikul Video: चिमुकल्या मायरा वायकुळने खरेदी केला iPhone 15 Pro Max, व्हिडीओ पाहिलात का?

Myra Vaikul Purchase iPhone: आपल्या नव्या आयफोनची झलक मायराने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे.
Published on

Myra Vaikul Purchase iPhone 15:

'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेली 'परी' म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ (Myra Vaikul) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत असते. मायराचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर ती नेहमी नवनवीन व्हिडीओ शेअर करत संपर्कात राहते. मायराच्या या प्रत्येक व्हिडीओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळते. मायरा वायकुळ पुन्हा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे मायराने नुकताच आयफोन १५ खरेदी केला आहे. आपल्या नव्या फोनची झलक मायराने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे.

Myra Vaikul
Gurmeet Choudhary's Video: गुरमीत चौधरी बनला रिअल लाईफ हिरो, बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला CPR देऊन मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर

मायरा वायकुळने नुकताच आयफोन १५ प्रो मॅक्स खरेदी केला. आई-बाबांसोबत Mapleच्या शॉपमध्ये जाऊन तिने आयफोन खरेदी केला. मायरासोबत तिच्या आई-बाबांनी देखील आयफोन खरेदी केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मायराने आपल्या नव्या आयफोनची झलक देखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने आयफोनचे अनबॉक्सिंग केले आहे. नवा आयफोन घेतल्यामुळे मायराला खूपच आनंद झाला आहे. तिच्या व्हिडीओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

'तुझी माझी रेशीमगाठ' या मराठी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर मायरा नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. कलर्स मराठी वाहिनीवरील 'नीरजा एक नई पहचान' या मालिकेच्या माध्यमातून मायराने हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले. तिच्या या मालिकेला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

मायरा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर चिमुकल्या मायराचे ६ लाख १९ हजार फॉलोअर्स आहेत. मायरा इन्स्टाग्रामवर नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. या माध्यमातून ती तिच्या नवीन प्रोजेक्टविषयी माहिती देत असते. मायराच्या नवनवीन पोस्टसाठी तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. चिमुकली मायराने लहान वयामध्येच खूप चांगली प्रसिद्धी मिळवली आहे.

Myra Vaikul
Hardik Joshi's Movie: 'खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते...', 'क्लब 52' मधील हार्दिक जोशीच्या लूकनं वेधलं लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com