Pushpa 2 Climax Scene Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Viral Video : ‘पुष्पा २’चा क्लायमेक्स सीन व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले; पाहा VIDEO

Pushpa 2 Climax Scene Viral Video : ‘पुष्पा २’च्या सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे. या व्हिडिओतून चित्रपटाचा क्लायमेक्स सीन व्हायरल झाल्यामुळे नेटकरी भडकले आहेत.

Chetan Bodke

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फाजिल स्टारर ‘पुष्पा २’ चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीझर, पोस्टर आणि २ गाणी रिलीज झालेली असून चित्रपटाची शुटिंग अजूनही सुरू आहे. नुकताच ‘पुष्पा २’च्या सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे. या व्हिडिओतून चित्रपटाचा क्लायमेक्स सीन व्हायरल होत आहे.

आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा टीझर, पोस्टर आणि २ गाणी आलेली आहेत. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती चित्रपटाची. अशातच शुटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये चित्रपटातील कलाकार एक फायटिंग सीन शूट करीत आहेत. व्हिडिओमध्ये, रक्ताने माखलेल्या माणसाला हार्नेसला लटकवलेले दिसत आहे. तर इतर क्रू मेंबर्स सीनबद्दल मॅनेजमेंट आणि शूटिंगसाठी मदत करत आहेत. हा व्हिडिओ कोणीतरी शुटिंग दरम्यान शुट केलेला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना दिसत नाहीये. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते व्हायरल करणाऱ्यांवर भडकले आहेत. अनेक चाहत्यांनी हा व्हिडिओ डिलिट करण्याची मागणी केली आहे. 'कृपया व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलिट करावा, चित्रपटाचा क्लायमेक्स खराब करू नये.', 'खूपच मस्त सीन. आता आम्ही चित्रपटाची प्रतिक्षा नाही करू शकत'. यापूर्वीही अनेकदा चित्रपटाच्या सेटवरून फुटेजेस लीक झाले होते.

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल स्टारर ‘पुष्पा २’ चित्रपट येत्या ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपटपूर्वी १५ ऑगस्टला रिलीज होणार होता. पण चित्रपटाच्या शुटिंगमुळे आणि एडिटिंग अपूर्ण राहिल्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल केला आहे. पॅन इंडिया चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये रिलीज झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT