Alia Bhatt On Jawan Trailer  Saam TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt On Jawan Trailer: 'चाहिए तो आलिया भट...' 'जवान'मधील शाहरुख खानच्या डायलॉगवर आलियाची प्रतिक्रिया

Alia Bhatt On Jawan: 'जवान'च्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान एक डायलॉगमध्ये अभिनेत्री आलिया भटचं नाव घेतो.

Pooja Dange

Shah Rukh Khan Mention Alia Bhatt In Jawan Trailer:

शाहरुख खानच्या बहुचर्चित चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर काल 'जवान'चा ट्रेलर दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर दाखविण्यात आला आहे.

'जवान'च्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान एक डायलॉगमध्ये अभिनेत्री आलिया भटचं नाव घेतो. आता आलिया भटने यावर उत्तर दिले आहे. चला पाहुया आलिया भट, शाहरुख़ खानला काय म्हणाली?

शाहरुख खानचा डायलॉग

ट्रेलरमध्ये शाहरुख खान व्हिलनच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे. त्याने मेट्रो हायजॅक केली आहे. दरम्यान अभिनेत्री नयनतारा आणि शाहरुख खानमधील एका संवाद आलिया भटचे नाव घेण्यात आले आहे. तर नयनतारा, शाहरुखला विचारते 'तुम्हे क्या चाहिए', यावर उत्तर देत शाहरुख खान म्हणतो, 'मुझे वैसे तो आलिया भट चाहिए'

जवानच्या ट्रेलरवर आलिया भटची प्रतिक्रिया

शाहरुख खानचा 'आलिया भट' उल्लेख असलेला हा डायलॉग प्रचंड व्हायरल होत आहे. आता अभिनेत्री आलिया भटने देखील यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. आलियाने म्हटले आहे की, 'और पूरी दुनिआ को चाहिए सिर्फ SRK!!! शाहरुख खान कसला भारी ट्रेलर आहे.. ७ सप्टेंबरसाठी खूप वाट पाहावी लागणार...'

आलिया भटने तिची ही प्रतिक्रिया तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे. जवानचा ट्रेलर इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत आलिया शाहरुख खानच्या जवानच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. तसेच तिने यामध्ये शाहरुख खानला टॅग देखील केले आहे.

Alia Bhatt Reaction On Jawan Trailer

शाहरुख जवानच ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे. अवघ्या २३ तासात ट्रेलरला २२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. शाहरुख़ या ट्रेलरची त्यांच्या फॅन्स आणि प्रेक्षकांना खूप आतुरता होती आणि अखेर ट्रेलर प्रदर्शित झाला. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT