Jawan Trailer on Burj Khalifa : बुर्ज खलिफालाही 'जवान'ची भुरळ, जगातल्या मोठ्या स्क्रीनवर झळकला ट्रेलर

Shah Rukh Khan Performed At Burj Khalifa : 'जवान'चा ट्रेलर दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर दाखविण्यात आला आहे.
Jawan Trailer Shown On Burj Khalifa
Jawan Trailer Shown On Burj KhalifaSaam TV

Shah Rukh Khan At Dubai For Jawan Trailer Launch:

शाहरुख खानच्या बहुचर्चित चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर काल 'जवान'चा ट्रेलर दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर दाखविण्यात आला आहे. यासाठी जवानची संपूर्ण टीम दुबईला गेली गेली. तर शाहरुख खान देखील हा क्षण अनुभवण्यासाठी दुबईला गेला होता.

शाहरुख खान फक्त तिकडे केला गेला नाही तर त्याने तिथे चित्रपटातील काही डायलाग देखील सादर केले. ज्यामुळे प्रेक्षक भारावून गेले. शाहरुख खानने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती. त्यावर रेड जॅकेट घातला असून गॉगल लावला होता.

Jawan Trailer Shown On Burj Khalifa
Rakhi Sawant Performs Umrah: हिंदू धर्म वाईट होता का? 'मक्का'हून परतलेल्या राखी सावंतने दिलेल्या उत्तरावर फॅन्सचा संताप

'जवान'चा ट्रेलर बुर्ज खलिफावर

स्टेजवर जाताना, शाहरुख म्हणाला, "येथे उपस्थित सर्व पालकांसाठी, बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर," त्यानंतर शाहरुखने त्याच्या सर्व चाहत्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाहरुखने काही संस्वाद देखील म्हटले, “मैं कौन हूं. कौन नहीं. पटा नहीं. माँ को किया वादा हूं. या अधूरा एक इरादा हूं. मैं अच्छा हूं. बुरा हूं. पुण्य हूं या पाप हूं. ये खुद से पूछना. क्यूंकी मैं भी आप हूं."

शाहरुख खान डायलॉग बोलताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. यावेळी फॅन्सची शाहरुखसाठी असलेली क्रेज पाहायला मिळाली.

शाहरुखने 'X'वरील आस्क मी एनिथिंग सेशनमध्ये बुर्ज खलिफावर ट्रेलर रिलीज होणार असल्याचे सांगितले होते.

शाहरुख जवानचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे. अवघ्या २३ तासात ट्रेलरला २२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. शाहरुख़ या ट्रेलरची त्यांच्या फॅन्स आणि प्रेक्षकांना खूप आतुरता होती आणि अखेर ट्रेलर प्रदर्शित झाला.

आलिया भटने तिची प्रतिक्रिया तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे. जवानचा ट्रेलर इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत आलिया शाहरुख खानच्या जवानच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. तसेच तिने यामध्ये शाहरुख खानला टॅग देखील केले आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com