Jawan Advance Booking: शाहरूखच बॉक्स ऑफिसचा‌ 'बादशाह'; अवघ्या 15 मिनिटांत 'जवान'ने केला विक्रम

Jawan First Day First Show: जवान'चे अॅडव्हान्स बुकिंग भारतातही सुरू झाले आहे.
Jawan Advance Booking
Jawan Advance BookingSaam TV
Published On

Jawan Advance Booking In India:

शाहरुख खानचे स्टारडम एक वेगळ्या लेवलवर आहे. त्याला कोणीही धक्का देऊ शकत नाही. चार वर्षांनी 'पठान' चित्रपटातून त्याने पुनरागमन केले तेव्हा त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता शाहरुख 'जवान' रिलीज होणार असल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात जवान चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग फार पूर्वीपासून सुरू झाले आहे. दरम्यान चाहते भारतातही चित्रपटाच्या अॅड्वान्स बुकिंगची वाट पाहत होते, विशेषत: ज्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो प्लॅन केला आहे. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. 'जवान'चे अॅडव्हान्स बुकिंग भारतातही सुरू झाले आहे.

Jawan Advance Booking
Shah Rukh Khan - Gauri Khan: बायकोला कसं सांभाळू? शाहरुख खानला नेटकऱ्याचा अजब प्रश्न; किंग खानने दिले तितकेच भन्नाट उत्तर

'जवान' हा शाहरुख खानचा पॅन इंडिया चित्रपट आहे, जो हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारानंतर आता निर्मात्यांनी भारतातही बुकिंग सुरू केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मुंबईत 'जवान'ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.

दिल्ली आणि आसपासच्या भागात (नोएडा आणि हरियाणा) 'जवान' चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. 2D मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची दिल्लीतील लोकांमध्ये तुफान क्रेज आहे. चित्रपटाच्या तिकिटांची किंमत 300-500 पर्यंत आहे.

Jawan Advance Booking
Salman Khan 35 Years Completed: सलमान खानची बॉलिवूडमध्ये ३५ वर्ष पूर्ण; भाईजानला चाहत्यांचं भन्नाट सरप्राईज, Video Viral

'जवान' मुंबईत क्लाउड नाइनवर आहे. लोक चित्रपट पाहण्यासाठी इतके उत्सुक आहेत की लोक 1000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत तिकीट खरेदी करण्यास तयार आहेत. ठाण्यात जवान चित्रपटाची 1100 रुपयांपर्यंत तिकिटांची विक्री झाली आहे.

सोशल मीडियावर अॅडव्हान्स बुकिंगशी संबंधित अनेक ट्विट लोकांनी शेअर केले आहेत. एका चाहत्याने लिहिले, "अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर १५ मिनिटांत सिनेपोलिस हाऊसफुल्ल झाले." एकूणच, जवानाचे बुकिंग भारतात मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि मुरादाबादमध्येही अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.

अॅटली कुमार दिग्दर्शित जवान ओव्हरसीजही चांगला व्यवसाय करत आहे. यूएसएमध्ये या चित्रपटाची 1.57 कोटी तिकिटे विकली गेली आहेत.

शाहरुख खान जवान या चित्रपटात दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. अॅटली कुमारसोबतचा शाहरुखचा हा पहिला चित्रपट आहे. साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत किंग खानचा देखील हा पहिलाच चित्रपट आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या निर्मिती अंतर्गत निर्मित जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com