Alia Bhatt Birthday  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Birthday : आधी स्टार किड म्हणून हिणवलं; आता आहे बॉलिवूडची क्वीन, एका भूमिकेने रातोरात चमकले नशीब

Alia Bhatt Superhit Movie : आज आलिया भट्टचा वाढदिवस आहे. तिच्या करिअरचा प्रवास जाणून घेऊयात. आलियाला एकेकाळी स्टार किड म्हणून ट्रोल केले जायचे, मात्र आता ती बॉलिवूडची राणी बनली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट्टचा आज वाढदिवस आहे.

आलिया भट्ट आज 33 वर्षांची झाली.

आलियाने आजवर अनेक सुपहिट चित्रपट केले आहेत.

बॉलिवूडची क्वीन आलिया भट्टचा (Alia Bhatt) आज (15 मार्च) वाढदिवस आहे. आज आलिया 33 वर्षांची झाली आहे. ती स्टार किड असूनही स्वबळावर तिने प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. सुरुवातीच्या काळात आलिया भट्टला ट्रोलिंगचा सामना करावा लागला, मात्र या सर्वांतून पुढे जात तिने इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे. तिच्या सौंदर्याचे जगभरात चाहते आहेत.

आलिया भट्टचे नाव चुलबुली अभिनेत्रींमध्ये येते. आलिया भट्टने 2012 साली रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. तिच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक करण्यात आले. या चित्रपटात ती बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली. 'स्टुडंट ऑफ द इयर' नंतर आलिया भट्ट अनेक चित्रपटात झळकली. ज्यात तिचे काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप झाले. तिने 'कलंक', 'उडता पंजाब', 'राजी', 'डियर जिंदगी', 'टू स्टेट्‍स', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'गली बॉय' सारखे हिट चित्रपट केले.

आलिया भट्टला खरी लोकप्रियता 2022 साली रिलीज झालेल्या 'गंगूबाई' चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाने इतिहास रचला. या चित्रपटातील अभिनयासाठी आलिया भट्टला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 'गंगूबाई' हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित होता. या चित्रपटामुळे आलिया भट्टच्या करिअरला नवी दिक्षा मिळाली. आलिया भट्ट आता लवकरच 'अल्फा' आणि'लव्ह अँड वॉर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आलिया भट्टने 2022ला बॉलिवूड स्टार रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांनी एकत्र 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. त्यानंतर 2022 मध्येच आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. जिचे नाव 'राहा' आहे. आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्राम 86.7 फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगडच्या महाडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर

Fridge storage dough: फ्रिजमध्ये मळून ठेवलेली कणीक किती दिवस वापरता येते?

Thane : ठाण्यात कैद्याचा पोलिसावर हल्ला, सर्वांसमोर कानाखाली मारली

सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवार उमेदवार देणार का? राष्ट्रवादीकडून अधिकृत माहिती समोर|VIDEO

Shahi Tukra Recipe: घरच्या घरी तयार करा टेस्टी मुघलई शाही तुकडा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT