Akshay Kumar visits Kedarnath shrine
Akshay Kumar visits Kedarnath shrine  Twitter
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Visits Kedarnath: कपाळी मळवट, गळ्यात रूद्राक्षाची माळ; केदारनाथच्या चरणी अक्षय कुमार

Pooja Dange

Akshay Kumar Share Photo Of Kedarnath Temple: अक्षय कुमार सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहे. उत्तराखंडला गेल्यानंतर अक्षयने केदारनाथचे दर्शन घेतले आहे. अक्षय कुमारने केदारनाथच्या मंदिराचा फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करता अक्षय कॅप्शनमध्ये 'जय बाबा भोलेनाथ' असे लिहिले आहे. तसेच 'हर हर शंभू' हे गाणे त्या फोटोच्या बॅकग्राउंडला वाजत आहे.

केदारनाथ मंदिरातून बाहेर येतानाच अक्षयचा व्हिडिओही समोर आला आहे. केदारनाथचे दर्शना करून बाहेर आल्यानंतर अक्षय हात जोडून 'जय भोलेनाथ'चा जयघोष करताना दिसत आहे. (Latest Entertainment News)

मंदिरात अक्षयच्या आजूबाजूला मोठी गर्दी दिसत आहे आणि अक्षय त्यांच्यासोबत अगदी शांतपणे उभा असल्याचे दिसत आहे. अक्षयसाठी तेथे सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली असली तरी मंदिरात तो सर्वसामान्य भाविकांसह त्याच्या रंगात रंगलेला दिसत आहे.

मंदिरातून बाहेर आल्यावर अक्षय कुमारच्या कपाळी मळवट दिसत आहे. तर त्याच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आहेत. तर हातात केदारनाथच्या नावाने बांधलेला दोरा आहे. अक्षय कुमार काळे कपडे घालून केदारनाथच्या दर्शनाला गेला आहे. ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक ट्राऊजर अक्षयने घातले आहे. तर अक्षयच्या हातात घड्याळ, टोपी आणि मोबाईल आहे.

अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनला गेला होता. मंगळवारी हेलिपॅडने तो केदारनाथला पोहोचला. त्याने येथे केदारनाथचे दर्शन घेतले.

नुकतेच अक्षय कुमारचे 'क्या लोगे तुम' हे गाणे रिलीज झाले आहे, जे बी प्राकने गायले आहे. हे गाणे अक्षय आणि अमायरा दस्तूर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. यापूर्वी बी प्राक आणि अक्षयने 'फिलहाल' आणि 'फिलहाल 2' मध्ये एकत्र काम केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT