Akshay Kumar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar : अक्षय कुमारवर कारवाई; SUV कार पोलिसांकडून जप्त, नेमकं कारण काय?

Akshay Kumar SUV Seized By Jammu Police: अक्षय कुमारला विमानतळावर सोडून आलेली कार पोलीसांनी जप्त केली आहे. नेमंक प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अक्षय कुमारच्या कारवर कारवाई करण्यात आली आहे.

अक्षयची SUV कार पोलिसांनी जप्त केली आहे.

अक्षय कुमारकडून जम्मूमधील कायद्याचे उल्लंघन झाले आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar ) अडचणीत आला आहे. अक्षय कुमार एका कार्यक्रमासाठी जम्मूला पोहचला. ज्या कारमधून अक्षय कुमार जम्मूमधल्या कार्यक्रमला पोहचला ती एसयूव्ही कार पोलिसांनी जप्त केली आहे. जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयच्या गाडीला काळ्या काचा आहेत. जे जम्मूमधील मोटार वाहन कायद्याच्या नियमांविरुद्ध आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या गाडीवर कारवाई केली आहे. त्यांनी नियमांचं उल्लंघन केले आहे.

जम्मूमधील वाहतूक पोलिसांनी सांगितले की, सामान्य नागरिक असो वा सेलिब्रिटी कायदा सर्वांसाठी समान आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र अद्याप अक्षय कुमारची या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आहे. अक्षय कुमार ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनाला जम्मूला गेला आहे. यावेळी अक्षयने रेंज रोव्हर मधून प्रवास केला. ती कार पोलीसांनी जप्त केली. यामुळे अक्षय कुमार आता अडचणीत सापडला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने प्रवासासाठी वापरलेली रेंज रोव्हर आयोजकांनी भाड्याने घेतली होती. अभिनेत्याने डोगरा चौक ते जम्मू विमानतळ असा प्रवास केला. विमानतळावरून गाडी पुन्हा येत असताना डोगरा चौकाजवळ वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवली आणि जप्त केली.

गाडीच्या खिडक्यांवर निर्धारित मानकांपेक्षा जास्त काळी फिल्म लावलेली आढळली. ज्यामुळे गाडीवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी काळ्या काचा लावण्याचे परवानगीशी संबंधित कागदपत्रे मागितली. पण असे कोणतेही पत्र नसल्यामुळे नियम तोडल्यामुळे कार जप्त करण्यात आली. आता या प्रकरणी कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT