राहुल गांधींसह ३०० खासदार आक्रमक, पोलिसांनी मोर्चा अडवला, आयोगाविरोधात ठिय्या आंदोलन, महिला खासदार बॅरिगेट्सवर चढल्या

Opposition INDIA Alliance Protest : निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजधानी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात आला. राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार, संजय राऊत, ठाकरे गटाचे खासदार आणि दक्षिण भारतातील खासदार सहभागी झाले.
Opposition INDIA alliance protest
Opposition INDIA alliance protestSaam TV News
Published On
Summary
  • राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ३०० खासदारांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

  • संसद भवनाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला

  • महिला खासदार व अखिलेश यादव बॅरिकेट्सवर चढले

  • ठाकरे, पवार, राऊत यांसह देशभरातील खासदारांची उपस्थिती

Women MPs climb barricades during Parliament gate protest : राजधानी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ३०० खासदारांनी आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला आहे. संसद भवनापासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खासदार आयोगाविरोधात धडक मोर्चा काढण्यासाठी निघाले. खासदारांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. निवडणूक आयोग चोर आहे, मतचोरी थांबवा, लोकशाही वाचवा.. अशा प्रकारच्या घोषणा खासदारांकडून दिल्या जात आहे. ३०० खासदारांचा मोर्चा संसदेच्या गेटजवळच पोलिसांनी रोखला. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर महिला खासदार आक्रमक झाल्या. अनेक खासदारांनी बॅरिगेट्सवर चढून जाण्याचा प्रयत्नही केला. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही बिरेकेटिंगवर चढून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सर्व खासदारांना अडवले आहे. या घटनेचे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत.

मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगाच्या विरोघात राहुल गांधी यांनी आंदोलन पुकारले आहे. देशातील ३०० विरोधक खासदारांनी आपला रोष व्यक्त केला. महाराष्ट्रातून ठाकरे, पवार यांचे खासदारही या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. त्याशिवाय अखिलेश यादव आणि त्यांच्या खासदारांनी आपला रोष व्यक्त केला आहे. शरद पवार, संजय राऊतही या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. दक्षिणेतून विरोधातील खासदारही एकवटले आहे. निवडणूक आयोगाला घेरण्यासाठी देशभरातली ३०० खासदार एकवटले आहे. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा मोर्चाला पोलिसांनी अडवले आहे. खासदार आक्रमक झाले असून आपला रोष व्यक्त करत आहेत.

Opposition INDIA alliance protest
Mumbai Metro Update : ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार, २ महिन्यात मेट्रो ४ सुसाट धावणार

मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मोर्चाची घोषणा केली होती. पण विरोधी पक्षांनी या आंदोलनासाठी औपचारिक परवानगी मागितलेलीच नाही. तरीही हा मोर्चा संसद भवनापासून निघाला आहे आणि मार्गावर सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे, असे  दिल्ली पोलिसांनी सांगितले.

Opposition INDIA alliance protest
Nagpur Video : नागपूरमध्ये माणुसकीचा अंत, पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेहण्याची वेळ, पतीची हतबलता कॅमेऱ्यात कैद

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही या मोर्चात भाग घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की निवडणूक आयोगावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. जर तक्रार असेल तर निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी. विशेषतः उत्तर प्रदेशात जिथे मतांची लूट होत आहे. त्यांनी असेही सांगितले की संसदेत आम्हाला आमचे मुद्दे मांडायचे आहेत, पण सरकार ऐकण्यास तयार नाही. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे अखिलेश यादव म्हणाले.

Opposition INDIA alliance protest
Mumbai Local : बदलापुरातून पनवेलला ३० मिनिटात लोकलने जा, रेल्वेचा जबरदस्त प्लॅन, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com