Nazima Death : सिनेसृष्टीवर शोककळा, 'देवदास' फेम अभिनेत्री नाझिमा यांचे निधन

Devdas Actress Nazima Passes Away : 'देवदास' चित्रपटातून लोकप्रियता मिळालेली ज्येष्ठ अभिनेत्री नाझिमा यांचे निधन झाले आहे. 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Devdas Actress Nazima Passes Away
Nazima DeathSAAM TV
Published On
Summary

लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री नाझिमा यांचे निधन झाले आहे.

77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

हिंदी सिनेमात त्यांनी अभिनेता-अभिनेत्रीच्या बहीण आणि मैत्रिणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

मनोरंजनसृष्टीतून दु:खद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री नाझिमा (Nazima) यांचे निधन झाले आहे. 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी 1960 आणि 1970 च्या दशक गाजवले आहे. नाझिमा यांचे निधन 11 ऑगस्टला झाले आहे.

नाझिमा यांच्या सहाय्यक भूमिका खूप चर्चेत राहील्या. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बहीण आणि मैत्रीणीच्या भूमिका साकारल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, नाझिमा या मुंबईत दादर येथे राहत होत्या. त्यांना दोन मुलं देखील आहेत. यांनी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

नाझिमा यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. नाझिमा यांना 'बेबी चांद' म्हणून ओळखले जायचे. बिमल रॉय यांच्या 'दो बिघा जमीन' या चित्रपटात नाझिमा यांनी मोठ्या बहिणीची भूमिका साकारली. नाझिमा यांना 'देवदास' चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अभिनयाचे आजही चाहते दिवाने आहेत.

नाझिमा यांचा 'अब दिल्ली दूर नाही' चित्रपटही खूप गाजला आहे. नाझिमा यांनी आपल्या काळात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'निशान','राजा और रंक', 'औरत', 'डोली', 'प्रेम नगर', 'मनचली' आणि 'बेईमान' अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. नाझिमा यांनी संजीव कुमार आणि राजेश खन्ना यांसारखी मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तसेच आशा पारेख, हेमा मालिनी आणि लीना चंदावरकर या ज्येष्ठ अभिनेत्रींसोबत देखील काम केले.

Devdas Actress Nazima Passes Away
Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com