Jolly LLB 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jolly LLB 3: अक्षय-अरशदच्या 'जॉली एलएलबी ३' ला कोर्टाकडून दिलासा; चित्रपटाविरोधातील याचिका फेटाळली, नेमकं प्रकरण काय?

Jolly LLB 3 Controversy: काही दिवसांपूर्वी अर्शद वारसी आणि अक्षय कुमार यांचा 'जॉली एलएलबी ३' हा चित्रपट वादात सापडला होता. निर्मात्यांवर चित्रपटात न्यायाधीश आणि वकिलांना चुकीचे चित्रित केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Shruti Vilas Kadam

Jolly LLB 3 Controversy: आतापर्यंत 'जॉली एलएलबी' या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत जे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाले आहेत. आता त्याचा तिसरा भाग देखील प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता यामुळे वाद निर्माण झाला होता. चित्रपटात वकील आणि न्यायाधीशांना चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले असल्यामुळे. निर्मात्यांविरुद्ध याचिका देखील दाखल करण्यात आली होती, जी आता फेटाळण्यात आली आहे.

'जॉली एलएलबी ३' प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय होता?

'जॉली एलएलबी ३' विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. जयवर्धन शुक्ला यांच्यासह ७ जणांनी चित्रपटाविरुद्ध याचिका दाखल केली होती आणि निर्मात्यांवर चित्रपटात कायदेशीर व्यवसायाचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर, टीझर आणि गाण्यांमुळे कायद्याविषयी गैरसमज निर्माण होऊन यामुळे न्यायव्यवस्थेचे गंभीर नुकसान होऊ शकते असे म्हणण्यात आले होते.

उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांना चित्रपटात न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकेल असे काहीही आढळले नाही. न्यायमूर्ती संगीता चंद्रा आणि न्यायमूर्ती ब्रिज राज सिंह यांच्या खंडपीठाने चित्रपटाचे तिन्ही ट्रेलर, टीझर आणि गाणी पाहिल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांच्या बाजूने निकाल दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, 'आम्ही 'भाई वकील है' या गाण्याचे बोल देखील वाचले आहेत आणि आम्हाला असे काहीही आढळले नाही जे प्रत्यक्षात वकिलांच्या कायदेशीर व्यवसायात समस्या निर्माण करेल.'

न्यायालयाने अक्षय आणि अर्शद यांना समन्स पाठवले होते

चित्रपटाच्या टीझरमध्ये ज्या प्रकारे दोन वकिलांमधील भांडण दाखवण्यात आले त्यामुळे पुण्यातही गोंधळ निर्माण झाला होता. वकील वाजेद खान आणि गणेश मस्खे यांनी पुणे दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि निर्मात्यांनी चित्रपटात कायदेशीर व्यवसाय चुकीच्या विनोदात सादर केल्याचा आरोप केला होता. या याचिकेच्या आधारे, चित्रपटातील दोन्ही कलाकार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत.

१९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'जॉली एलएलबी ३' बद्दल बोलायचे झाले तर, अक्षय-अरशद व्यतिरिक्त, या चित्रपटात सौरभ शुक्ला, अमृता राव आणि हुमा कुरेशी यांच्याही भूमिका आहेत. निर्माते लवकरच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT