Lagnanantar Hoilach Prem: काव्या व पार्थ आणि जीवा व नंदिनी यांच्या नात्यांची होणार नवी सुरुवात, पाहा VIDEO

Lagnanantar Hoilach Prem Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण करत आहे. या मालिकेत सतत गैरसमज, वाद, दुःख आणि नात्यांमध्ये आलेला दुरावा दाखवण्यात आला होता.
Lagnanantar Hoilach Prem Serial
Lagnanantar Hoilach Prem SerialSaam Tv
Published On

Lagnanantar Hoilach Prem Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण करत आहे. आतापर्यंत या मालिकेत सतत गैरसमज, वाद, दुःख आणि नात्यांमध्ये आलेला दुरावा दाखवण्यात आला होता. पण आता कथानकात असा एक मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

मालिकेतील कपल काव्या आणि पार्थ यांच्यात लग्नानंतर अनेक वाद झाले. सतत भांडणं आणि गैरसमजांमुळे त्यांचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलं होतं. मात्र पार्थच्या एका निर्णयामुळे त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा प्रेमाची नवी सुरुवात होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. प्रेक्षकांना भावूक करणाऱ्या या प्रसंगामुळे या जोडीचं भविष्य आता काय वळण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Lagnanantar Hoilach Prem Serial
The Bengal Files: मी दोषी आहे, मला शिक्षा द्या...; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना संदेश, पाहा VIDEO

दुसरीकडे जीवा आणि नंदिनी हेही त्यांच्या नात्यातील संघर्षामुळे वेगळे झाले होते. पण आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा रोमान्स परतताना दिसतो आहे. हळुवार गप्पा, हसणं आणि एकत्र घालवलेले छोटे छोटे क्षण यातून त्यांचं प्रेम पुन्हा खुलू लागलं आहे.

Lagnanantar Hoilach Prem Serial
Actress Death: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीचं निधन; वयाच्या ३९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

यात आणखी एक धक्कादायक पण रोमांचक ट्विस्ट म्हणजे दोन्ही कपल सहा महिन्यांसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. 'या काळात नातं वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला जाईल' असं कथानकात दाखवण्यात आलं आहे. यामुळे या सहा महिन्यांचा प्रवास त्यांच्या नात्यांना खरंच नवी दिशा देईल का, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com