Ajay Devgn In Singham Again Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Ajay Devgn Look: ‘आला रे आला सिंघम आला...’; 'सिंघम अगेन'मधील अजय देवगणचा खतरनाक लूक एकदा पाहाच

Singham Again Poster: सोशल मीडियावर बाजीराव सिंघमचा म्हणजेच अजय देवगणचा एक धडाकेबाज लूक समोर आलाय.

Chetan Bodke

Ajay Devgn Singham Again Poster

सिंघम, सिंघम रिटर्न्स आणि आता सिंघम अगेन. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ची चर्चा होत आहे. सप्टेंबर महिन्यापासून, ‘सिंघम अगेन’च्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटातील अनेक कॅरेक्टर्सचे पोस्टर्स सुद्धा व्हायरल झाले होते. अशातच सोशल मीडियावर बाजीराव सिंघमचा म्हणजेच अजय देवगणचा एक धडाकेबाज लूक समोर आलाय. (Bollywood)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

करीना कपूर खान, अक्षय कुमार, रणबीर सिंग, दीपिका पदुकोण, श्वेता तिवारी आणि आता अजय देवगणचा धडाकेबाज लूक समोर आला आहे. ‘सिंघम’ सीरीजमध्ये अजय देवगणने बाजीराव सिंघमचे पात्र साकारले आहे. आता त्याचा पोलिसांच्या गणवेशात आणि प्रचंड रागीट असलेला लूक समोर आला आहे. अभिनेत्याचा हा लूक एकदम जबरदस्त दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय. त्यामुळे ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ प्रमाणे ‘सिंघम अगेन’मध्येही बाजीराव सिंघम बनून थिएटर गाजवणार यात तिळमात्र शंका नाही. (Bollywood Film)

दिग्दर्शक रोहित शेट्टीने चित्रपटातला लूक शेअर करताना पोस्टर्सला एकदम जबरदस्त कॅप्शन दिले. दिग्दर्शकांनी कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘शेर आतंक मचाता है, और जख्मी शेर तबाही! सर्वांचाच आवडता कॉप बाजीराव सिंघम इज बॅक’ असं म्हणत त्याने लूक शेअर केला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याचा हा लूक जोरदार व्हायरल होत आहे. नेहमी प्रमाणेच हा सुद्धा लूक चाहत्यांना खूपच भावला आहे. अवघ्या काही वेळापूर्वीच हा पोस्टर शेअर करण्यात आला होता. काही वेळातच या पोस्टरला इन्स्टाग्रामवर ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. (Bollywood Actor)

करीना कपूर खान, अक्षय कुमार, रणबीर सिंग, दीपिका पदुकोण आणि श्वेता तिवारी यांचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या स्टार्सने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. ज्याची एक एक झलक दिग्दर्शकाने सोशल मीडियावर शेअर केली होती. चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या ह्या लूकने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

SCROLL FOR NEXT