छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. हा शो दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विक्की जैन (Vicky Jain) यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अंकिता लोखंडे या शोमध्ये तिच्या पर्सनल लाईफसोबत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपुतबाबत एकापाठोपाठ एक खुलासे करत आहे. अशामध्ये आता अंकिताने सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी का नाही गेली यामागचे कारण सांगितले आहे.
'बिग बॉस 17'च्या घरामध्ये मुनव्वर फारुकीशी बोलताना अंकिता लोखंडेने तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगितले. सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा मी त्याच्याबद्दल जे काही बोलले त्यावर कोणीही माझ्यायावर विश्वास ठेवला नाही. यावेळी अंकिता लोखंडे खूपच इमोशनल झाली होती. त्या आठवणी सांगताला अंकिताला खूपच दु:ख झाल्याचे दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नुकताच समोर आलेल्या बिग बॉसच्या प्रोमोमध्ये, मुनव्वर फारुकी स्विमिंग पूलजवळ बसून तुटलेल्या मनावर एक शायरी ऐकवतो. त्यावेळी त्याच्यासोबत अंकिता लोखंडे आणि ईशा मालवीय बसलेल्या दिसत आहेत. अंकिता मुनव्वरला सांगते, 'या सगळ्या गोष्टी बोलू नकोस, त्या दिवसांची आठवण आल्यास मला राग येतो. पण तू म्हणालास ते मला आवडले.' मुनव्वरने आपली शायरी पूर्ण केल्यानंतर अंकिता 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' मधील 'कौन तुझे..' हे गाणं गाते.
यानंतर मुनव्वरने अंकिता लोखंडेला सांगितले की, 'मी यशराज स्टुडिओमध्ये सुशांतसोबत त्याचे स्पेशल स्क्रिनिंग पाहिले.' हे जाणून अंकिता आश्चर्यचकित होते आणि म्हणते, 'खूप छान.' मुनव्वर म्हणतो की, 'ती एकच संधी होती जेव्हा मी त्याला भेटलो होतो.' अंकिता पुढे म्हणते की, 'तो खूप चांगला माणूस होता. मी असे कधीच बोलत नाही, हे मला खूप विचित्र वाटते. म्हणजे आता ठीक आहे. मी सामान्य झाले आहे. सुशांत देखील विक्कीचा मित्र आहे. आता तो या जगात नाही आणि ही सर्वात वाईट भावना आहे.'
मुनव्वरने अंकिताला विचारले की, 'काय चूक झाली ते तुला माहीत आहे.' अंकिता म्हणते, 'मला आता याविषयी बोलायचे नाही पण तसे नाही. मला नाही सांगायचे तुला काही.' मुनव्वर पुढे म्हणतो की, 'मी विचारत नाही.' अंकिता त्याला अडवते आणि म्हणते, 'मला माहीत आहे.' याशिवाय अंकिताने खुलासा केला की, 'त्यावेळी माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. पण ठिक आहे तो नाही. एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून जाते.. एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून गमावणे हा माझा पहिला अनुभव होतो. असा प्रकार घडला हे अतिशय धक्कादायक होते.'
अंकिता पुढे म्हणते, 'मी त्यांच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते. मी जाऊच शकले नाही. कारण मला वाटले की मी हे पाहू शकत नाही.' अंकिता पुढे म्हणाली, 'विक्कीने मला सांगितले होते की तू जाऊन ये. मी त्याला म्हटले नाही. मी कसं पाहू शकते हे सर्व. असा अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीच घेतला नव्हता. मुन्ना, मी माझ्या वडिलांना पहिल्यांदा असे पाहिले. कोणाचं जाणं काय असतं हे मला कळालं. मला वडिलांची खूप आवठवण येते.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.