'Tiger 3' मधील सलमान- कतरिनाचे रोमँटिंक गाणं पाहिलंत का?, अरिजीत सिंगच्या 'Ruaan'ने जिंकली प्रेक्षकांची मनं

Tiger 3 Romantic Song: 'टायगर ३' च्या निर्मात्यांनी सलमान खान आणि कतरिना कैफचे रोमँटिंक गाणं 'रूआन' (Ruaan Song) रिलीज केले आहे.
Ruaan Song
Ruaan SongSaam Tv

Ruaan Song Out:

सलमान खान (Salman Khan), कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि इम्रान हाश्मी स्टारर 'टायगर ३' चित्रपटाला (Tiger 3 Movie) प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी सलमान खानचे चाहते थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहे. आता निर्मात्यांनी सलमान खान आणि कतरिना कैफचे रोमँटिंक गाणं 'रूआन' (Ruaan Song) रिलीज केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिनेमॅटिक विश्वात सध्या 'टायगर 3' ची चर्चा होते आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ या जोडीने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. टायगर 3 चत्रपटानवंतर आता या चित्रपटातील रोमँटिक गाणं 'रुआन'ने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या गाण्याला खूप चांगली पसंती मिळत आहे. या गाण्याचा ऑडिओ याआधी रिलीज झाला होता. जो लोकांना खूप आवडला होता. या गाण्याचा व्हिडिओ पाहण्याची मागणी प्रेक्षकांकडून होत होती.

6 नोव्हेंबरला 'टायगर 3' मधील 'रुआन' गाण्याचा ऑडिओ ट्रॅक रिलीज झाला. त्यावेळी निर्मात्यांनी निर्णय घेतला होता की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे व्हिडिओ व्हर्जन प्रदर्शित केले जाईल. आता 20 नोव्हेंबर रोजी 'टायगर 3'च्या निर्मात्यांनी 'रुआन' या रोमँटिक ट्रॅकचा व्हिडिओही रिलीज केला.

'टायगर 3' मधील 'रुआन' हे रोमँटिंक गाणं प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने गायलं आहे. तर प्रीतम यांनी संगीतबद्ध केले असून इर्शाद कामिल यांनी ते लिहिले आहे. 'टायगर 3' मधील 'रुआन'चे व्हिडिओ व्हर्जन यूट्यूबवर 2 तासांत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले. कमेंट सेक्शनमध्ये चाहते या गाण्याचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.

Ruaan Song
Salman Khan On Tiger 3: 'टायगर ३'च्या रिलीजनंतर पहिल्यांदाच बोलला सलमान खान, चाहत्यांचे मानले आभार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com