मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards 2022) हे भारतीय कलाकारांसाठी नेहमीच खास असतात. देशभरातील कलाकारांना सन्मानित करताना ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज दिल्लीत घोषणा करण्यात आली. नॅशनल मीडिया सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध पुरस्कार घोषित करण्यात आले. अजय देवगणला(Ajay Devgan) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला.
या संपूर्ण कार्यक्रमात सर्वांच्या नजरा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीच्या नावावर होत्या आणि आता ही नावंही समोर आली आहेत. यंदा दोन कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे. अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेता सूर्या(Surya) यांना ६८ वा राष्ट्रीय चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार(National Film Awards 2022 Best Actor) मिळाला आहे.
सकाळपासूनच सर्वांच्या नजरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ कडे लागल्या होत्या. हा पुरस्कार हिंदी सिनेविश्वासाठी सर्वात मोठा मानला जातो. अशा स्थितीत अजय देवगण आणि सूर्या यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता अजय देवगणला २०२० मध्ये आलेल्या 'तानाजी' या चित्रपटसाठी, तर दाक्षिणात्य अभिनेता सूर्याला २०२० मधील सुपरहिट चित्रपट 'सोराराई पोतरू' अर्थात 'उडान' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आले आहे.
गेल्यावर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याचवेळी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला 'पंगा' आणि 'मणिकर्णिका' या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अजय देवगण आणि सूर्याला ज्या चित्रपटांतील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घोषित झाला, ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.