

मुंबई: अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुली(Rupali Ganguly) 'स्वयंवर: मिका दी वोटी'(Swayamvar: Mika Di Vohti)मध्ये गेस्ट म्हणून आली होती. शोमध्ये रुपाली गांगुली मेहंदी आणि हळदी स्पेशल एपिसोडमध्ये सहभागी झाली होती. रुपालीने शोमध्ये नीत महल, आकांक्षा पुरी आणि प्रणितिका दास या टॉप ३ नववधूंच्या लग्नाच्या विधींना हजेरी लावली होती. लग्नाच्या विधी बघून रुपालीला तिचा लग्न सोहळ्याची आठवण झाली.
रुपाली गांगुलीला तिच्या लग्नाचे दिवस आठवले आणि तिने अश्विनशी घाईत कसे लग्न केले हे सांगितले. प्रेक्षकांची लाडकी अनुपमा म्हणाली, 'माझे लग्न थोडे वेगळे होते. मी माझ्या पतीसाठी १२ वर्षे वाट पाहिली, कारण ते अमेरिकेत होते आणि मला भारतात राहायचे होते. ते ४ फेब्रुवारीला भारतात आले आणि म्हणाले परवा आपण लग्न करू'.
'रुपाली पुढे म्हणाली, 'मी तेव्हा एक मालिका करत होते, म्हणून मी निर्मात्यांकडे दोन दिवसांची रजा मागितली. तेव्हा ते मला म्हणाले 'तुमचा ट्रॅक सुरू आहे, तुम्ही सुट्टी कशी घेऊ शकता. तुम्हाला सुट्टीची गरज का आहे? मग मला माझ्या लग्नाबद्दल त्यांना सांगावं लागलं. आम्ही आमच्या पालकांनाही सांगितले. लग्नाचे कोणतेही विधी होणार नाहीत, म्हणून मी खूप अस्वस्थ होते. मी माझ्या एपिसोडसाठी शूट केले आणि दोन दिवस सुट्टी घेतली.
मी माझ्या लग्नाबद्दल इतकी आनंदी होते की मी माझ्या खांद्यापर्यंत मेहंदी काढली होती. मेहंदी फंक्शन पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होता. तेव्हाच हळदीच्या विधीही झाल्या, कारण तेव्हा वेळ नव्हता. ६ फेब्रुवारीला रजिस्ट्रार येणार होते. मी सकाळी लग्नाची साडी विकत घ्यायला गेले होते. मी दुकानात गेले आणि साडी मागितली. माझ्या नवऱ्याला लग्नाला पोहोचायला उशिर झाला, म्हणून ते शर्ट आणि जीन्समध्ये लग्नासाठी आले होते, असं रुपालीने पुढे सांगितलं.
त्यांना वाटलं होतं की फक्त सहीच करायची आहे. माझ्या वडिलांनी १५ मिनिटांपूर्वी सांगितले की, त्यांना माझं कन्यादान करायची इच्छा आहे. मग कशीबशी पुरोहितांची व्यवस्था केली. अश्विनने गाडीही पार्क केली नाही आणि पुरोहित मंत्र म्हणू देखील लागले. अशा प्रकारे माझे लग्न १५ मिनिटांत आणि मेहंदी ४ तासांत झाली, असा किस्सा रुपालीने सांगितला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.