राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ९ मराठी कलाकारांना पुरस्कार जाहीर

भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत मोठा पुरस्कार कार्यक्रम असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आज ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली आहे
rahul deshpande and kishor kadam
rahul deshpande and kishor kadam saam tv

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत मोठा पुरस्कार कार्यक्रम असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आज ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली आहे. या चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी कलाकारांचा डंका पाहायला मिळाला आहे. मराठी कलाकारांना ९ पुरस्कार जाहीर झाले आहेत. ( 68th National Film Awards News In Marathi )

rahul deshpande and kishor kadam
Samantha Prabhu : सामंथा घेणार मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण, 'या' हिरोसोबत पहिल्यांदाच झळकणार

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत मोठा पुरस्कार कार्यक्रमात मराठी कलाकारांना ९ चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. गोष्ट एका पैठणीची हा मराठी सिनेमा सर्वोत्कृष्ठ मराठी सिनेमा ठरला आहे. तर पार्श्वगायनासाठी राहूल देशपांडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

जून या मराठी चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ मेनन याला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि वांछित या चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तानाजी सिनेमाला उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार जाहीर झाला आहे. नचिकेत बर्वे यांना हा उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळात सेन्सरर्ड झालेल्या सिनेमांना विशेष पुरस्कार मिळाले आहेत.

rahul deshpande and kishor kadam
आलिया भट्टने मिनी ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केले बेबी बंप, तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो बघून चाहते झाले खुश

दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगणला ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमासाठी मिळाला आहे. अभिनेता सूर्याला ‘सूरराय पोट्रू’साठी जाहीर झाला आहे. ‘1232 किलोमीटर मरेंगे तो वहीं जाकर’ या सिनेमासाठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड’ आणि थ्री सिस्टर्स यांना घोषित करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com