Ajay Devgn Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ajay Devgan: मुलांच्या बॉलिवूड पदार्पणाच्या 'त्या' प्रश्नावर अजय देवगण स्पष्टच बोलला, म्हणाला...

अभिनेता अजय देवगण त्यांच्या 'भोला' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच, त्याने ट्विटरवर चाहत्यांसह #AskBholaa या सत्राद्वारे संवाद साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ajay Devgan News: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच प्रकाशझोतात असतो. अनेकदा अजय देवगण हा मुलगी न्यासा देवगणमुळे ट्रोल होतो. न्यासा देवगणने अद्याप चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले नसले तरी सोशल मीडियावर न्यासा ही तिच्या स्टायलिश अदांजामुळे लक्ष वेधून घेते आहे. अलिकडेच अजयला मुलगी न्यासा ही चित्रपटात कधी प्रवेश करणार? असे नेटकऱ्यांनी विचारले असता, यावर अजयने न्यासा आणि माझं याबत काही बोलणं झालेलं नाही, ना कधी मुलीने तिची इच्छा व्यक्त केली, असे सांगितले आहे. जेव्हा न्यासा चित्रपटात येईल तेव्हा ती साऱ्यानांच दिसेल असे त्याने म्हटले आहे.

अभिनेता अजय देवगण त्यांच्या 'भोला' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच, त्याने ट्विटरवर चाहत्यांसह #AskBholaa या सत्राद्वारे संवाद साधला. ज्यामध्ये नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारले ज्यावर अजयने सर्वाच्या शंकाचे निरसन केले आहे. दरम्यान, अजय देवगणने मुलगा युगच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल सांगितले. चाहत्यांना ट्विटर संवाद साधण्यासाठी आमंत्रित करत अजयने प्रमोशन व्यस्त शेड्युलमधून मधून ब्रेक घेत 'भोला' या चित्रपटांबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा असे ट्विट केले होते.

अभिनेता अजय देवगण त्याच्या आगामी चित्रपट भोलामुळे ट्रेंन्ड करत आहे. आता नेटकऱ्यांना अजयचा मुलगा चित्रपटात कधी प्रवेश करणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. युग बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार की नाही? अजय देवगणला एका चाहत्याने हाच प्रश्न विचारला, यावर अजयने जे उत्तर दिले आहे त्याने साऱ्यानांच हसू अनावर झाले आहे.

अजयच्या एका चाहत्याने अजय देवगणला विचारले की, सर युगला बाॅलिवूडमध्ये कधी लॉन्च करणार आहेत? यावर अजय देवगणने, लॉन्चचे माहिती नाही पण, आता सध्या त्याने वेळेवर लंच केले तरीही मोठी गोष्ट आहे. असे म्हटले आहे.

अजयच्या या उत्तरावर सोशल मीडियावर चाहत्यांनी अजय देवगणच्या या स्टाइलचे कौतुक केले आहे. तर अजयच्या एका चाहत्याने संस्कारी वडील आहेत. तर आणखी एका यूजरने लिहिले की, भोला आगीचा गोळा आहे, असे म्हटले आहे.

बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अजय देवगणचा हा चित्रपट 30 मार्च रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत. चित्रपटात अजयने केवळ अभिनयच केला नाही तर त्याचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे.

चित्रपटात तब्बू, संजय मिश्रा, दीपक डोबरियाल आणि गजराज राव देखील दिसणार आहेत. 'भोला' हा २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'कैथी' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाशिवाय अजय देवगण 'मैदान', 'औरो में कहां दम था', 'सिंघम अगेन' आणि 'नाम' मध्ये दिसणार आहे.

Edited By- M anasvi Choudhary

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

SCROLL FOR NEXT