Urfi Javed Video: उर्फीच्या Dooriyan गाण्याची नेटकऱ्यांमध्ये क्रेझ, ट्रोल करणारे नेटकरी चक्क करत आहेत उर्फीचं कौतुक

उर्फीचे नवीन गाणे 'दूरियाँ' प्रदर्शित झाले आहे.
Urfi Javed
Urfi JavedSaam Tv
Published On

Urfi Javed New Music Video: अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. फॅशन आणि कपड्यांवरून चर्चेत असणारी उर्फी आता तिच्या नव्या गाण्यामुळे नेटकऱ्यांच्या गप्पांचा भाग झाली आहे. नुकतेच उर्फीचे नवीन गाणे 'दूरियाँ' प्रदर्शित झाले आहे.

उर्फीच्या नवीन गाण्याचे सोशल मीडिया कौतुक होत आहे. तिचे 'दूरियाँ' हे हे गाणं नेटकऱ्यांच्या पसंतीस पसंत आहे. मुंबईत या गाण्याची लाँच पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये उर्फी जावेद, शिवानी कश्यप आणि नीरज कुमार यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. या गाण्यात उर्फीची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.

Urfi Javed
Rajpal Yadav Birthday: पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर राजपालने केलं दुसरं लग्न.. अशी आहे दोघांची लव्हस्टोरी

इरॉसचे हे नवीनतम गाणे यूट्यूबवर लाँच करण्यात आले आहे. या गाण्यात उर्फी आणि नीरज कुमार दिसत आहेत. शिवानी कश्यपने हे गाणे गायले आहे. उर्फीच्या या गाण्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या गाण्याला 1.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. उर्फी गाण्यात खूपच स्टायलिश दिसत आहे.

यापूर्वी उर्फी 'हाय-हाय ये मजबूरी' या बॉलिवूड हिट गाण्याच्या रिमेकमध्ये दिसली होती. उर्फी जावेदचे हे गाणे देखील सुपरहिट ठरले होते. उर्फीचे 'दूरियाँ' या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लाँच कार्यक्रमात उर्फी जावेदला मीडियाने तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल देखील विचारले. तेव्हा उर्फीने सांगितले की, आज ती जे काही आहे तो लोकांच्या द्वेषामुळे आहे. लोकांनी तिला प्रेम नाही तर द्वेष दिला आहे. उर्फी म्हणाली की, 'लोकांना मी तुरुंगात जावे असे वाटते.'

उर्फी जावेदने हे देखील सांगिलते की, तिला शो खतरों के खिलाडी, लॉकअप किंवा इतर कोणत्याही शोसाठी तिला संपर्क करण्यात आलेला नाही. खतरों के खिलाडीचा भाग बनून तिला आनंद होईल, असे उर्फीचे म्हणणे आहे. मात्र अद्याप तिच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com