Rajpal Yadav Birthday: पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर राजपालने केलं दुसरं लग्न.. अशी आहे दोघांची लव्हस्टोरी

राजपाल यादवची पत्नी राधाने पतीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Rajpal Yadav Birthday Special
Rajpal Yadav Birthday Special Instagram @rajpalofficial

Rajpal Yadav Love Story: बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता राजपाल यादवचा 16 मार्च रोजी वाढदिवस आहे. राजपाल 52 वर्षाचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसनिमित्त पत्नी राधा हिने राजपालला शुभेच्छा दिल्या आहेत. राजपाल यादववर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या राधाने त्याच्यासाठी देवाकडे आनंद आणि आशीर्वाद मागितले आहेत.

नेहमी आनंदी आणि हसतमुख असणारा राजपाल यादव त्याच्या खऱ्या आयुष्यातही अगदी तसाच आहे. 'साधी राहणी उच्च विचारसरणी' हा नियम तो पाळतो. कदाचित राजपाल यादवच्या या स्टाईलवर कॅनडाची राधा प्रभावित झाली आणि अभिनेत्यासोबत सेटल होण्यासाठी भारतात आली.

Rajpal Yadav Birthday Special
Kapil Sharma: तुझे कलाकार शो सोडून का जातात? या प्रश्नावर कपिल शर्माने दिलेलं उत्तर चर्चेत

राजपाल यादवची पत्नी राधाने पतीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले आहेत. राधाने सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'तुझ्या या वाढदिवसानिमित्त मी तुला या जगातील सर्व सुख मिळो अशी प्रार्थना करते. मी प्रार्थना करतो की तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच मिळेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा पती.'

राजपाल यादव आणि त्यांची पत्नी राधा यांच्यात वयात ९ वर्षांचे अंतर आहे. राजपाल यादवने राधासोबत दुसरे लग्न केले आहे, परंतु त्यांनी हे कधी जाणवू दिले नाही. राजपाल यादव यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. राजपाल यादव कॅनडात राधाला भेटला तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. त्यांची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे.

राजपाल यादवने एका मुलाखतीत राधासोबत प्रेमविवाह केल्याचे सांगितले होते. 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ स्पाय' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता कॅनडाला गेला तेव्हा तेथे दोघांची पहिली भेट झाली. तिथे एका कॉमन फ्रेंडने राधा आणि राजपाल यादव यांची भेट घडवून आणली. एका कॉफी शॉपमध्ये भेट झाली. तिथे राजपाल यादव आणि राधा एकमेकांशी खूप गप्पा मारल्या. त्यांच्या भेटीचे प्रमाण वाढले. त्यांचा हा दिनक्रम पुढची १० दिवस असाच सुरू होता.

काही दिवसातच राजपाल यादव आणि राधा एकमेकांच्या प्रेमात पडले. शूटिंग शेड्यूल संपवून राजपाल यादव 10 दिवसांनी भारतात परतला. मात्र भारतात आल्यानंतरही राजपाल यादव आणि राधा यांच्यात बोलणे सुरूच होते.

जवळपास 10 महिने फोनवर एकमेकांशी बोलल्यानंतर राधाने भारतात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. राजपाल यादवसाठी राधा तिची सॅक आणि बॅगपॅक करून भारतात आली. त्यानंतर काही काळाने दोघांनी लग्न केले. राजपाल यादव आणि राधा यांना दोन मुली आहेत. राजपाल यादवला त्याची पहिली पत्नी करुणा हिच्यापासून ज्योती नावाची एक मुलगी आहे. तिचे लग्न झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com