Aishwarya Rajinikanth's Jewellery Stolen from her House
Aishwarya Rajinikanth's Jewellery Stolen from her House Instagram @aishwaryarajini
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rajinikanth: धक्कादायक! रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याच्या घरी चोरी; 3.60 लाखाचे दागिने लंपास

Saam Tv

Aishwarya Rajinikanth House Robbery: ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिला सगळेचजण ओळखतात. ऐश्वर्या रजनीकांत तमिळ चित्रपट दिग्दर्शक आहे. अलीकडेच, ऐश्वर्याच्या घरातून लाखोंचे हिरे आणि सोन्याचे दागिने गायब झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.

ऐश्वर्याच्या घरातून हरवलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 3.60 लाख असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलीस सध्या आयपीसीच्या कलम ३८१ (घरगुती नोकराकडून चोरी) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

एफआयआर अहवालात, ऐश्वर्याने नमूद केले की तिला तिच्या घरातील तीन कर्मचार्‍यांवर संशय आहे ज्यांना दागिन्यांची माहिती होती. तिच्या चेन्नईतील घरातील लॉकरमध्ये सोन्याचे आणि हिऱ्याचे 60 दागिने ठेवण्यात आले होते.

या दागिन्यांमध्ये डायमंड सेट, प्राचीन सोन्याचे दागिने, मंदिरातील दागिन्यांमधील न कापलेले हिरे, नवरत्न सेट, अरामचे नेकलेस, बांगड्या, संपूर्ण अँटीक अनकट हिरे आणि सोन्याचे दोन गळ्यातील हार यांचा समावेश आहे.

ऐश्वर्याने तिचे दागिने 2019 मध्ये तिची बहीण सौंदर्याच्या लग्नात शेवटचे वापरले होते. तेव्हापासून ते तिने लॉकरमध्ये ठेवले होते. गेल्या महिन्यात लॉकरमधून दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर चित्रपट ऐश्वर्याने तक्रार दाखल केली.

लग्नानंतर लॉकर अनेक ठिकाणी हलवण्यात आल्याचेही तिने नमूद केले. आधी ती सेंट मेरी रोडवरील तिच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. नंतर ती धनुषसोबत घेतलेल्या त्याच्या घरी गेली आणि नंतर पुन्हा तिच्या सेंट मेरी रोड अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली.

गेल्या वर्षी लॉकर तिचे वडील रजनीकांत यांच्या घरी ठेवले होते. लॉकरच्या चाव्या तिच्या कपाटाच्या असल्या तरी तिच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती होती, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. ती घरी नसतानाही कर्मचारी अपार्टमेंटमध्ये असायचे.

ऐश्वर्या तिच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'लाल सलाम' या क्रिकेटवर आधारित राजकीय चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ऐश्वर्याचे वडील रजनीकांत कॅमिओची भूमिका साकारणार असल्याने या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT