Bholaa On Box Office: नवा विक्रम..! २-३ तास झाले नाहीत तोच अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 'भोला'ने केली करोडोंची कमाई

Ajay Devgn in Bholaa:'भोला' चित्रपटाचे बुकिंग १२ दिवस आधी सुरू झाले.
Bholaa Advance Booking
Bholaa Advance BookingInstagram /@ajaydevgn

Bholaa Advance Booking: अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटामध्ये अजय देवगण दमदार भूमिका साकारणार आहे. काळ या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याची घोषणा करणारा व्हिडिओ अजय देवगणने शेअर केला होता. हा व्हिडिओ समोर येताच प्रेक्षकांनी चित्रपटाचे बुकिंग करण्यास सुरुवात केली. प्रेक्षक या चित्रपटाच्या किती प्रतीक्षेत आहेत, हे आपल्याला चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग वरून लक्षात येईल.

अजयने रविवारी 'भोला' चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग झाल्याचे सांगितले. IMAX 3D आणि 4DX 3D मध्ये चित्रपटाचे बुकिंग सुरू झाल्याचे अजय आणि तब्बूने सांगितले.

Bholaa Advance Booking
Alka Yagnik Birthday: प्रेमविवाह केलेल्या अलका गेली २७ वर्ष आपल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहतात.. घटस्फोट नाही तर 'हे' आहे कारण

अजय देवगण या चित्रपटात अभिनयासह दिग्दर्शनहि करत आहेत. 'भोला' चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य चित्रपट 'कैथी'च अधिकृत रिमेक आहे. ३० मार्च रोजी 'भोला' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

साधारणतः चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग चित्रपट प्रदर्शित होण्याच्या २-३ दिवस आधी सुरू होते. परंतु 'भोला' चित्रपटाचे बुकिंग १२ दिवस आधी सुरू झाले. IMAX 3D आणि 4DX 3D मध्ये काल दिवसभरात या चित्रपटाच्या १२०० हुन अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. 'भोला' चित्रपट जरी रिमेक असला तरी प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

या चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासूनच या चित्रपटाची चर्चा होती. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली. काल रात्रीच्या अपडेटनुसार, भोलाने अॅडव्हान्स तिकीट बुकिंगमध्ये 7.05 लाख रुपये कमावले आहेत.

IMAX 3D साठीची 4.25 लाख रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. 'भोला' चांगला व्यवसाय करू शकतो, हे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच, जसजशी रिलीज डेट जवळ येईल तसतशी तिकीट बुकिंगची संख्या आणखी वाढेल, असे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com