Alka Yagnik Birthday: प्रेमविवाह केलेल्या अलका गेली २७ वर्ष आपल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहतात.. घटस्फोट नाही तर 'हे' आहे कारण

Alka Yagnik Marriage: अलका रेल्वे स्टेशनवर शिलाँगचे व्यावसायिक नीरज कपूर यांना धडकल्या.
Alka Yagnik Birthday
Alka Yagnik Birthday Instagram @therealalkayagnik

Alka Yagnik and Neeraj Kapoor: आपल्या आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका अलका याग्निक यांचा आज (२० मार्च) वाढदिवस आहे. ९०च्या दशकात अलका यांच्या गायनाने अनेकांना वेड लावले होते. लहान वयातच अलका यांनी त्यांच्या करियरची सुरूवात केली. आपल्या गाण्याने सामान्य जनतेला प्रेमाची परिभाषा शिकवणाऱ्या अलका यांना मात्र जीवनात खूप त्याग करावा लागला.

वयाच्या दहाव्या वर्षी 'पायल कि झंकार' या चित्रपटातील 'थिरकता अंग लचक झुकी' गाणे गात त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिले नाही. यशाच्या शिखरावर असताना अलका यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. अलका रेल्वे स्टेशनवर शिलाँगचे व्यावसायिक नीरज कपूर यांना धडकल्या. त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते की त्या नीरज यांच्या प्रेमात पडतील. आधी दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचा रूपांतर प्रेमात झाले.

Alka Yagnik Birthday
Deepak Tijori: अभिनेता दीपक तिजोरीची फसवणूक, सहनिर्मात्याने लावला कोट्यवधींचा चुना

१९८८ मध्ये प्रेमात पडल्यानंतर अलका आणि नीरज यांनी त्यांच्या पालकांना त्यांच्या त्याच्याविषयी आणि लग्नाच्या निर्णयाबद्दल सांगितले. दोघांच्या घरच्यांनी यावर हो म्हटलं, पण सगळ्यांना फक्त अलकाच्या करिअरचीच चिंता होती. सर्व गोष्टींचा विचार करून अलका याग्निक आणि नीरज कपूर यांनी १९८९ मध्ये लग्न केले. अलकाने यांनी आयुष्याचा एक नवा प्रवास सुरू केला. त्यांच्या या गोड आठवणींसोबत त्यांच्या जीवनात दुःखाचे वारे वाहू लागले.

नीरज कपूरसोबत लग्नबंधनात अडकलेल्या अलका यांच्या जीवनात एकमेकांपासून विभक्त होण्याची वेळ आली. अलका याग्निक 27 वर्षांपासून पती नीरजपासून वेगळ्या राहत आहेत. अलका आणि नीरज यांच्या नात्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरल्या. परंतु सत्य काही वेगळेच आहे. अलका आणि नीरज यांच्या भांडण झालेले नाही. मग कोणालाही प्रश्न पडू शकतो की दोघे इतकी वर्ष वेगळे का राहत आहेत?

तर त्यामागचं कारण आहे अलका याग्निक यांचे करिअर. अलका कामानिमित्त मुंबई आणि नीरजची शिलाँगमध्ये राहतात. दोघांच्या कामामुळे त्यांना वेगळे राहावे लागते. अनेकांना वाटत होते की त्यांच्या नात्यातील अंतरामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात, परंतु असे काहीही झाले नाही. अलका याग्निक आणि नीरज कपूर यांचे नाते आजही तितकेच गोड आहे जितके लग्नाच्या वेळी किंवा आधी असायचे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com