Deepak Tijori: अभिनेता दीपक तिजोरीची फसवणूक, सहनिर्मात्याने लावला कोट्यवधींचा चुना

Deepak Tijori File Compliant: मोहन नाडर यांनी करारानुसार शूटिंग पूर्ण न करता दीपक तिजोरी यांची फसवणूक केली.
Deepak Tijori
Deepak TijoriInstagram @deepaktijoriteam

Deepak Tijori Cheated By Co-Producer: बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरी याने मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दीपक तिजोरी यांची त्यांच्या सहनिर्मात्याने २ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दीपक यांनी १५ मार्च आरोपी मोहन नाडर यांच्या विरोधावत तक्रार दाखल केली आहे.

दीपक तिजोरी यांनी 2019 मध्ये लिहिलेल्या टीपसी या चित्रपटाचे शूटिंग लंडन येथे होणार होते. त्याप्रमाणे सहनिर्माते आणि आरोपी मोहन नाडर यांच्यासोबत करार देखील करण्यात आला होता. करारानुसार मोहन यांना दीपक तिजोरी यांनी २ कोटी ५० लाख रुपये दिले होते. मात्र मोहन नाडर यांनी करारानुसार शूटिंग पूर्ण न करता दीपक तिजोरी यांची फसवणूक केली.

Deepak Tijori
Salman Khan News : सलमान खानला पुन्हा एकदा धमकी; पोलिसांनी घेतली मोठी अॅक्शन

दीपक यांनी मोहन नाडर यांच्याकडे दिलेले पैशांची मागणी केली असता नाडर पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभिनेता दीपक तिजोरी त्याने आंबोली पोलीस ठाण्यात कलम 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहे.

दीपक यांनी सांगितले की, 'नाडर यांनी लंडन येथील एका लोकेशनचे पैसे देण्यासाठी माझ्याकडून सप्टेंबर २०२९ मध्ये पैसे घेतले होते. मोहन नाडर याने पैसे परत देण्याचे वचन दिले होते. त्यानंतर तो पैसे देण्यासाठी टाळाटाळ करू लागला. त्याने दिलेले चेक सुद्धा बाउन्स व्हायचे.'

दीपक यांनी आशिकी या चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त दीपक अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील दिसले आहेत. आता ते अभिनयात सक्रिय नसून दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्राकडे वळले आहेत. दीपक तिजोरी दिग्दर्शित दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com