Aishwarya Rai Video saam tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Aishwarya- Aaradhya Bachchan At Cannes 2026 : सौंदर्यवती ऐश्वर्या रायची कान्सच्या रेड कार्पेटवर दमदार एन्ट्री झाली. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्यासोबत लेक आराध्या बच्चनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

ऐश्वर्या रायच्या एन्ट्रीने कान्सच्या रेड कार्पेटला चारचाँद लावले.

ऐश्वर्या रायसोबत तिची लेक देखील कान्सला आली.

ऐश्वर्याचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले.

सध्या सर्वत्र 'कान्स फिल्म फेस्टिवल 2026' ची (Cannes Film Festival 2026) चर्चा पाहायला मिळत आहे. अखेर सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन कान्सच्या 'रेड कार्पेट'व झळकली. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यंदा ऐश्वर्या राय आपल्या लेकीसोबत म्हणजेच आराध्या बच्चनसोबत आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 'कान्स फिल्म फेस्टिवल' च्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात आराध्या बच्चन ऐश्वर्या रायसोबत दिसली. रेड गाऊनमध्ये आराध्या खूपच सुंदर दिसत होती.

कान्स फिल्ममध्ये ऐश्वर्या रायने निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये हटके एन्ट्री घेतली. 'कान्स फिल्म फेस्टिवल 2026'च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायने चारचाँद लावले. मोकळे केस, गळ्यात सुंदर नेकपीस आणि ग्लॉसी मेकअपमध्ये ऐश्वर्या विश्व सुंदरी दिसत होती. त्यांच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा झाले. 'कान्स' मध्ये चमकल्यानंतर संध्याकाळच्या एका कार्यक्रमासाठी ऐश्वर्या आपल्या लेकीसोबत पोहचली. तिने गुलाबी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. ती अत्यंत मोहक दिसत होती. तिचा हा लूक पाहून उपस्थितांचे डोळे दिपून गेले. ऐश्वर्याच्या गुलाबी गाऊनवर फुलांची नाजूक नक्षीकाम पाहायला मिळाले.

आराध्या ऐश्वर्यासोबत कान्सच्या कार्यक्रमाला पोहचली

कान्सच्या कार्यक्रमाला ऐश्वर्या रायसोबत तिची लेक देखील आली होती. आराध्या बच्चनने लाल रंगाचा सॅटिन गाऊन परिधान केला होता. तिच्या लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअपमध्ये आराध्या आईसारखीच अप्रतिम दिसत होती. आई आणि मुलीचा हा क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला.

ऐश्वर्या-आराध्याच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहे. चाहत्यांनी या आई-मुलीच्या जोडीचे भरभरून कौतुक केले. एका चाहत्याने लिहिले की, "राणी आणि राजकन्या!" दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले, "आराध्या आणि ऐश्वर्या किती सुंदर दिसत आहेत!" तिसऱ्या चाहत्याने लिहिलं की, "आई तशी लेक" एकंदर कान्समध्ये ही माय-लेकीची जोडी सुपरहिट ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बाणेर-म्हाळुंगेजवळ प्रचंड वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी ताटकळले

जरागेंच्या सरकारपुढे 10 मागण्या, सरकारला 28 मेचा अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT