Aishwarya Rai News  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या रायचा विमानतळावरील लूक वेधतोय चाहत्याचं लक्ष; चर्चा तर होणारच!

ऐश्वर्या विमानतळाच्या बाहेर येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. विमानतळावरील ऐश्वर्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच व्हायरल झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या 'पोन्नियन सेल्वियन' (Ponniyin Selvan) चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सध्या ऐश्वर्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या कायमच सक्रिय असते. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचा एअरपोर्ट लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच ऐश्वर्या शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऐश्वर्याचा एअरपोर्ट लूकवर चाहते अटकळ्या लावत आहे.

नुकताच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. आणि पापाराझींनी तिला घेरले. विमानतळावरील ऐश्वर्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या सैल पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसते आहे. यासह तिने काळा सनग्लासेस लावला आहे. ऐश्वर्याचा हा लूक सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

ऐश्वर्या विमानतळाच्या बाहेर येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. विमानतळावरील ऐश्वर्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच व्हायरल झाले. ऐश्वर्याचा लूक पाहून यूजर्स म्हणाले की कदाचित ती प्रेग्नंट आहे आणि तिच्या घरी आणखी एक बाळ येणार आहे. एका यूजरने 'तुम्ही प्रेग्नंट आहात असे दिसते आहे. लवकरच चांगली बातमी येत आहे.' तर दुसऱ्याने 'ती प्रेग्नंट आहे का, बेबी नंबर 2 येत आहे.'अश्या कमेंट केल्या आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन विमालतळावरील ड्रेसिंगमुळे नाहीच तर तिच्या फॅटी लूकमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्याच्या जाळ्यात अडकली आहे. काही युजर्सना ती गरोदर असल्याचे वाटते आहे तर काहीनी ती सैल ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप लपवत असल्याचं म्हटलं आहे. मात्र खरचं ती दुसऱ्यादा आई होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अभिनेत्रीने यावर अद्यापही कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, ऐश्वर्या राय बच्चन लवकरच मणिरत्नम यांच्या 'पोन्नियन सेल्वियन' चित्रपटात दिसणार आहे. हा मणिरत्नमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्याचा पहिला भाग 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. ऐश्वर्यासह विक्रम, त्रिशा, कार्ती, जयम रवी, जयराम, पार्थिवन, लाल, विक्रम प्रभू, प्रकाश राज यांच्यासह अनेक स्टार्स या चित्रपटात दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ती राणी नंदिनी आणि मंदाकिनी देवीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT