Jackie Chan Fake Death News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Fake Death News: धर्मेंद्र यांच्यानंतर जॅकी चॅनच्या मृत्यूच्या अफवा, नेमकं सत्य काय?

Jackie Chan Fake Death News: "ही-मॅन" धर्मेंद्र यांच्या खोट्या निधनाच्या बातम्यांनंतर आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी व्हायरल होत आहेत. पण, अभिनेता जिवंत आणि बरा आहे.

Shruti Vilas Kadam

Jackie Chan Fake Death News: "ही-मॅन" धर्मेंद्र यांच्या खोट्या निधनाच्या बातम्यांनंतर आता मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता जॅकी चॅन यांच्या निधनाच्या बातम्याही फिरत आहेत. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील अनेक पोस्टमध्ये असा दावा केला आहे की ते आता आपल्यात नाहीत. काही जण असा दावा करतात की त्यांच्या पत्नी आणि मुलीने याची पुष्टी केली आहे. तथापि, हे दावे खोटे आहेत. ७१ वर्षीय अभिनेता जिवंत आणि बरा आहे.

खरं तर, जॅकी चॅन यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि त्याचे कारण त्यांच्या जुन्या दुखापतीचे होते. त्यात लिहिले होते, "७१ वर्षीय जॅकी चॅन यांचे दशकांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. हॉलिवूडच्या दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि कुटुंबाने याची पुष्टी केली आहे."

लोकांनी जॅकी चॅनबद्दल पोस्ट केली

दुसऱ्याने असा दावा केला की त्यांचे निधन आरोग्याच्या समस्यांमुळे झाले आहे, "२०१६ ऑस्कर विजेते जॅकी चॅन यांचे अनेक महिन्यांच्या उपचारानंतर निधन झाल्याची पुष्टी झाली आहे." याव्यतिरिक्त, कोणीतरी लिहिले, "जॅकी चॅन यांचे चार दिवसांपूर्वी निधन झाले आणि कोणीही काहीही सांगितले नाही?" त्यानंकर एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत लिहिले, "या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करण्यापूर्वी लोकांना नीट माहिती तपासावी. मला त्यांना वारंवार सांगावे लागते की जॅकी चॅन जिवंत आणि ठिक आहेत."

जॅकी चॅनच्या मृत्यूच्या अफवा यापूर्वीही समोर आल्या आहेत

असे वृत्त हे पहिल्यांदाच घडलेले नाही. २०१५ मध्येही जॅकी चॅनच्या मृत्यूच्या अफवा समोर आल्या होत्या. यावर अभिनेत्याने स्वतः प्रतिक्रिया देत म्हटले की, "जेव्हा मी फ्लाइटमधून उतरलो तेव्हा दोन बातम्यांनी मला धक्का बसला. मी अजूनही जिवंत आहे आणि अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चुकीच्या UPI ID वर पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन नका घेऊ; या स्टेप्स फॉलो करा, मिनिटात पैसे येतील परत

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

Mustard Oil For Skin: त्वचेला लावा मोहरीचे तेल, फक्त १० दिवसांत दिसेल मोठा फरक

Raigad Tourism : साहसप्रेमींसाठी आव्हानात्मक ट्रेकचा अनुभव, रायगडजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा

Chanakya Niti : नातेवाईकांना या ४ गोष्टी सांगूच नका, अन्यथा नाव खराब झालंच, वाचा चाणक्य काय सांगतात

SCROLL FOR NEXT