Nysa Devgan Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

न्यासाचा ग्लॅमरस लूक बघून फॅन्सचा 'याड लागलं...' , कोण आहे जाणून घ्या!

अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगणचे काही मनमोहक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. न्यासाचा दिलखेचक अंदाज पाहून चाहते वेडे झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण(Ajay Devgan) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांची मुलगी न्यासा देवगन (Nysa Devgan) जरी बॉलिवूडपासून दूर असली तरी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. न्यासा सध्या स्पेनमध्ये आहे, तिथे ती तिच्या मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या सगळ्यामध्ये तिच्या व्हेकेशनचे काही खास नवीन फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये न्यासाचा दिलखेचक अंदाज पाहून चाहते वेडे झाले आहेत.

फोटोमध्ये, न्यासा बॉडीकॉन शॉर्ट स्कर्ट आणि पांढर्‍या स्नीकर्ससह पांढर्‍या फुल-स्लीव्ह टॉपमध्ये दिसत आहे. मोकळ्या केसात ती खूप गोंडस दिसत आहे. फोटोतील तिचा लूक पाहून नेटकरी तिच्या स्टाइलचे चाहते झाले आहेत.

न्यासाचे हे मनमोहक फोटो तिचा मित्र ओरहान अवत्रामणीने त्याचा इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. न्यासाच्या मित्राने स्पेनमधील वेगवेगळ्या ठिकाणांचे फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यात बार्सिलोनामधील कासा बाटलो, सारख्या सुंदर ठिकाणांचा समावेश आहे. हे फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'इन स्पेन डब्ल्यू/ओ द एस'. न्यासानेही तिच्या मित्राच्या पोस्टवर कमेंट केली आणि 'नो एक्स-क्यूज नो सेव्हिंग' असे लिहिले.

न्यासा अलीकडेच जान्हवी कपूरला अॅमस्टरडॅममध्ये भेटली जेव्हा ती तिच्या सुट्ट्यांसाठी अॅमस्टरडॅमला गेली होती. त्यादरम्यान, न्यासा जान्हवीसोबत लंच करताना दिसली. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर न्यासासोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली होती. यानंतर न्यासाचा एक बोल्ड फोटो समोर आला होता, ज्यामध्ये ती बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची मुलगी माहिका रामपालसोबत लंडनमधील एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसली होती.

न्यासा सध्या स्वित्झर्लंडच्या ग्लियन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे.एका मुलाखतीत जेव्हा न्यासाच्या करिअर प्लॅनवर अभिनेता अजय देवगणला प्रश्न विचारला तेव्हा त्याने सांगितले की, "मला माहित नाही की तिला फिल्म इंडस्ट्रीत यायचे आहे की नाही. तिने अद्याप इंडस्ट्रीत येण्याच्या दिशेने तिची रुची दाखवलेली नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT