खुदा हाफिज- २च्या निर्मात्यांनी मागितली माफी, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा 'खुदा हाफिज चाप्टर २ अग्नी परीक्षा' च्या निर्मात्यांनी सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली.
Khuda Hafiz Chapter 2 Agni Pariksha  Image
Khuda Hafiz Chapter 2 Agni Pariksha ImageSaam Tv

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा(Vidyut Jammwal) 'खुदा हाफिज चाप्टर २ अग्नी परीक्षा'(khuda haafiz 2) च्या निर्मात्यांनी सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली. चित्रपट निर्मात्यांनी शिया समुदायाची माफी मागितली आहे. या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हक हुसैन' या गाण्यावर शिया समुदायाच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. निर्मात्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

Khuda Hafiz Chapter 2 Agni Pariksha  Image
Janhit Mein Jaari: चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप, लेखक राजनं दिलं उत्तर

शिया समुदायातील काही सदस्यांनी 'हुसैन'या शब्दाचा आणि हत्यारांचा चुकीच्या प्रकारे वापर केल्यामुळे 'हक हुसैन' या गाण्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे 'खुदा हाफिज चॅप्टर २ अग्नि परीक्षा'च्या निर्मात्यांनी जारी केलेल्या निवेदनात माफी मागितली आहे. 'हक हुसैन' या गाण्यातील काही शब्दांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे आम्ही मनापासून माफी मागतो आहोत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

शिया समुदायाच्या भावना लक्षात घेऊन गाण्याचे बोल 'हक हुसैन' वरून 'जुनून है' असे बदलण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच या चित्रपटात कोणतेही नकारात्मक चित्रण करण्यात आलेले नाही, असेही निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

Khuda Hafiz Chapter 2 Agni Pariksha  Image
मुंबईत पाऊस अन् मलायकाचा अर्जुनवर प्रेमवर्षाव; पाहा पॅरिस ट्रिपची रोमँटिक झलक

गाण्यामध्ये केला बदल

'खुदा हाफिज चॅप्टर २ अग्नी परीक्षा'च्या निर्मात्यांनी या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'सीबीएफसी सेन्सॉर बोर्डाच्या सल्ल्यानुसार, आम्ही हत्यार या गाण्यामधून काढून टाकले आहे आणि आम्ही 'हक हुसैन' गाण्याचे शब्द बदलून 'जुनून है' केले आहेत. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने कोणतेही चित्रण करण्यात आलेले नाही किंवा चित्रपटात कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करताना दाखवण्यात आलेले नाही.'

निर्मात्यांनी सांगितले, 'या गाण्यात इमाम हुसैन यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. अत्यंत प्रामाणिक हेतूने हे गाणं तयार केले गेले आहे. धार्मिक भावना दुखावण्याचा यामध्ये हेतू कधीही नव्हता. तथापि, आम्ही या गाण्यामध्ये बदल केले आहेत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com