मुंबई : लेखक जितेंद्र ग्यानचंदानी यांनी 'जनहित में जारी'(Janhit Mein Jaari) चित्रपटाचे लेखक राज शांडिल्य यांच्यावर चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप केला होता. या चित्रपटाची कथा त्यांनीच लिहिली असल्याचा दावा जितेंद्र यांनी केला आहे. दिग्दर्शक-लेखक राज शांडिल्य यांनी जितेंद्र यांचे हे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. 'जनहित में जारी' या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) मुख्य भूमिकेत होती. राजबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटात येण्यापूर्वी राज कपिल शर्मासाठी अनेक वर्षांपासून लिहित होता. 'जनहित में जारी'या चित्रपटासाठी काम करण्यापूर्वी राज शांडिल्य याने 'ड्रीमगर्ल' चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.
जितेंद्रने आपली संकल्पना चोरल्याची तक्रार नोंदवली आहे. ही कथा 'कंडोम प्यार की पहली शर्त' या नावाने गौतम प्रसाद शॉसोबत लिहिली होती, असे जितेंद्र यांचे म्हणणे आहे. २०१९मध्ये त्याची ही कथा पटकथा लेखक असोसिएशनमध्ये नोंदवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जितेंद्र यांनी सांगितले की, 'गौतमने २०१७ मध्ये ही कथा त्यांच्या नावावर नोंदवली होती. आम्हाला ही कथा एका दिग्दर्शकाने अधिक चांगली करण्यासाठी दिली होती. २०१९ मध्ये त्या दिग्दर्शकाला आमची कथा आवडली. मला आणि गौतमला या कथेवर एकत्र काम करण्यासाठी बोलावले. आम्ही ही कथा २०१९ मध्ये पटकथा लेखक असोसिएशनमध्ये एकत्र नोंदवली. गौतमने जून २०२० मध्ये राजला ही गोष्ट सांगितली आणि नोव्हेंबर २०२० मध्ये राजने त्याच्या 'जनहित में जारी' या चित्रपटाची घोषणा केली'.
वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचे जितेंद्र यांनी सांगितले. त्याचवेळी, जितेंद्र यांनी सांगितले की, या परिस्थितीत माझ्यासोबत लढण्यासाठी माझा सह-लेखक माझ्यासोबत नाही, कारण असे अनेक लेखक आहेत ज्यांच्याकडे बॉलिवूडमधील या चुकीच्या गोष्टींविरोधात लढण्याची क्षमता नाही.
त्याचवेळी 'जनहित में जारी' चित्रपटाचे लेखक राज शांडिल्य याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राज म्हणाले की, 'आम्ही त्यांना कायदेशीर नोटिशीद्वारे उत्तर दिले आहे. आमची कथा २०१७ मध्येच अधिकृतपणे नोंदवण्यात आली होती. आता कोणीही उठून असा दावा कसा काय करू शकतो ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.