Bigg Boss Marathi canva
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस'च्या घरात पॅडीदादा ढसाढसा का रडला? विशाखा सुभेदारने सांगितलं कारण...

Bigg Boss Marathi 5 Vishakha Subedar Instagram Post: बिग बॉसच्या घरामध्ये पॅडीदादा रडतांनाचा व्हिडिओ अभिनेत्री विशाखा सुभेदारने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये विशाखा म्हणाली की....

Saam Tv

गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील सदस्यांना उकडलेलं अन्न खायला मिळत आहे. सदस्यांना उकडलेलं जेवण देण्यामागचं कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून घरातील सदस्य अन्न वाया घालवत होते. त्यासोबतच काही सदस्यांनी अन्नाचा त्यागही केला होता. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना बिग बॉसकडून उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा दिली आहे. त्यासोबतच अन्न सर्वांची मुलभूत गरज असते. परंतु, आजही महाराष्ट्रामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे लोकांना पुरेसं अन्न मिळत नाही आणि काही नाही मिळाल्यास पाणी पिऊन झोपावं लागत. या परिस्थितीची घरातील सर्व सदस्यांना जाणीव करून देण्यासाठी बिग बॉसने घरातील सदस्यांना शिक्षा दिली आहे.

बिग बॉसचे हे शब्द ऐकून पॅडीच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. याचदरम्यान पॅडीचा हा व्हिडिओ अभिनेत्री विशाखा सुभेदारने तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. विशाखाने तिचा पॅडीसोबत घडलेला एक खास किस्सा पोस्टच्या माध्यमातून सांगितला.

अभिनेत्री विशाखाने पंढरीनाथ कांबळे म्हणजेच आपल्या पॅडी दादाचा भावुक झालेला व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रावर पोस्ट केला आहे. अभिनेत्रीने लिहिले की, "आपला पॅडी नेमकं का रडला? खरं सांगायचं तर...पॅडीला आम्ही अत्यंत जवळून पाहिले आहे... पॅडिचा स्वभाव अत्यंत प्रामाणिक आहे. तो सर्वांनाच मदत करतो, अनेकांसोबत त्याचा स्वभाव दयाशील देखील आहे. पॅडीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक जबरदस्त किस्सा आठवला. आम्ही एका प्रयोगासाठी जाताना रस्ता चुकलो होतो. त्यावेळी रस्त्यावरील एका बाईला रस्ता विचारला. तिने रस्ता सांगताना म्हटलं की तुम्ही तर माझ्याच घरावरून जाणार आहेत. माझ्या घरापुढे गेल्यावर डावीकडे वळलं की मग उजव्या बाजूला तुमचं ठिकाण येईल."

पुढे अभिनेत्री म्हणाली की, "पॅडी हसत हसत म्हणाला की आम्हाला काही कळलं नाही. मग त्या बाईने पुन्हा एकदा रस्ता सांगितला. त्यानंतर पॅडीने मला विचारलं की आपण त्या बाईच्या घराजवळून जाणार आहेत ना मग तिला तिच्या घरी सोडवूयात का? मग त्या बाईला आम्ही गाडीमध्ये घेतलं आणि तिनं तिच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. आमच्या गप्पा रंगल्या. गप्पा मारता मारता तिनं सांगितलं की पहिल्यांदाच इतक्या मोठ्या गाडीत बसले आहे. मग तिला तिच्या घरासोर सोडलं आणि पॅडीने विचारलं तू हिला ओळखलं नाहीस का? दररोज टीव्हीवर दुपारी एक सीरियल लागते शुभ विवाह, त्यामधील रागिनीचे काम करते. हे ऐकताच त्या बाईने मला ओळखलं आणि म्हणाली की तुम्ही साडीमध्ये खूप वेगळे दिसता. त्यानंतर त्या बाईने आमचे आभार मानले आणि तिच्या घरी गेली." तिचा आनंद पाहून पॅडीला अत्यंत आनंद झाला. पॅडी बिग बॉसमध्ये खूप चांगला खेळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT