urmila matondkar birthday  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urmila Matondkar Birthday: 'रंगीला गर्ल'चं करिअर एका चुकीने झालं होतं उद्धवस्त; धर्माच्या सीमा ओलांडून केलं लग्न

Urmila Matondkar Controversy: अनेक हिट चित्रपट देणारी उर्मिला मातोंडकर आपल्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती.

Chetan Bodke

Urmila Matondkar Affair Controversy

१९९० च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये उर्मिला मातोंडकरचं नाव कायमच घेतलं जातं. अनेक हिट चित्रपट देणारी उर्मिला आपल्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे ती चर्चेत आली होती. उर्मिलाला आपल्या खासगी आयुष्यमध्ये एका चुक फार महागात पडली आहे. आज उर्मिला तिचा ५० वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. (Bollywood)

उर्मिला मातोंडकरला रामगोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' चित्रपटातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. 'रंगीला' चित्रपटानंतर रामगोपाल वर्मा यांच्या अनेक चित्रपटांतून उर्मिला मातोंडकरने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर रंगली होती. ज्यावेळी ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर रंगली त्यावेळी रामगोपाल यांनी एका चित्रपटातून माधुरी दीक्षितला काढून उर्मिलाला कास्ट केलं होतं. (Bollywood News)

अनेक मीडिया रिपोर्टनुसार, ज्यावेळी रामगोपाल वर्मा यांच्या पत्नीला रामगोपाल आणि उर्मिलाच्या अफेअरबद्दल कळलं. त्यावेळी तिने थेट उर्मिलाच्या कानाशिलातच लगावली होती. इतकंच नाही तर, त्यानंतर रामगोपाल वर्मा यांचा घटस्फोटही झाला होता. आणि त्यानंतर त्यांचं उर्मिलासोबतचं नातंही संपुष्टात आलं. त्यांच्या ह्या अफेअर्समुळे उर्मिलाच्या करियरची राख रांगोळी झाली.

अखेर, २०१६ मध्ये उर्मिलाने ९ वर्ष लहान असलेल्या काश्मिरचा बिझनेसमन आणि मॉडल मोहसीन अख्तर मीरसोबत गुपचूप लग्न केलं. मोहसीन अख्तरची आणि उर्मिलाची मनीष मल्होत्राने भेट करुन दिली आहे. मोहसिन अख्तर मुळचा काश्मिरचा आहे. उर्मिला मातोंडकर पहिल्यांदा १९८९ मध्ये रिलीज झालेल्या 'चाणक्य' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली. उर्मिलाने आपल्या वादग्रस्त सिनेकारकिर्दित मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

उर्मिला सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसून सध्या ती महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे. २०१९ मध्ये उर्मिलाने मुंबईमधून कॉंग्रेस पक्षातून निवडणूक लढवली होती. पण भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याकडून उर्मिलाला पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर अवघ्या ५ महिन्यात काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत २०२० मध्ये उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT