Shivrayancha Chhava:ऐतिहासिक भूमिकेत दिसणार रवी काळे; साकारणार 'ही' दमदार भुमिका

Ravi Kale : ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. आजवर विविधांगी भूमिका साकारणारे रवी काळे आता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
Shivrayancha Chhava:ऐतिहासिक भूमिकेत दिसणार रवी काळे; साकारणार 'ही' दमदार भुमिका
Published On

Shivrayancha Chhava In Ravi Kale:

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे यांनी मराठी, हिंदीसह, तामिळ, तेलगू चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते सिद्ध केले आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' या चित्रपटातही ते आता स्वराज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका साकारणार आहेत.

(Latest News)

या चित्रपटाच्या निमित्ताने रवी काळे प्रथमच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. आजवर विविधांगी भूमिका साकारणारे रवी काळे आता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते. बहिर्जी नाईक यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. मला 'शिवरायांचा छावा' या चित्रपटात तशी संधी मिळाली ही नक्कीच आनंदाची बाब असल्याचं रवी काळे सांगितले.

Shivrayancha Chhava:ऐतिहासिक भूमिकेत दिसणार रवी काळे; साकारणार 'ही' दमदार भुमिका
Singer Shan: पार्श्वगायक शान यांना ‘आशा भोसले’ पुरस्कार जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com