Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Healthy Eating : बाहेरचं अन्न, जंक फूड, जास्त साखर-तेलकट पदार्थ आणि चुकीच्या जेवणाच्या सवयींमुळे वजन वाढतं. लठ्ठपणा टाळण्यासाठी योग्य आहार आणि आरोग्यदायी सवयी आवश्यक आहेत.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam Tv
Published On

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. वजन वाढल्यावर एकाच जागेवर बसून काम करणे, शरीराची हालचाल कमी होणे, आरोग्याशी संबंधीत समस्या वाढणे अशा समस्या वाढत चालल्या आहेत. लठ्ठपणा किंवा वजन वाढणे ही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जगभरातील लोकांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे.

याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बाहेरचं अन्न, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूड. धावपळीच्या वेळापत्रकामुळे लोक अनेकदा वेळ वाचवण्यासाठी सहज मिळणारे पदार्थ खाण्याकडे वळतात. मात्र हे पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात आणि शरीरात चरबी जमा होऊन लठ्ठपणा वाढतो.

Weight Loss Tips
Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

अनेकदा जेवणाची चव किंवा ताणतणावामुळे लोक गरजेपेक्षा जास्त अन्न खायला सुरुवात करतात. पुढे शरीराला लागणाऱ्या कॅलरीजपेक्षा अधिक कॅलरीज घेतल्या गेल्या तर त्या चरबीच्या स्वरूपात साठू लागतात. त्याचबरोबर समोसे, पकोडे, चिप्स, फ्रेंच फ्राईज यांसारखे तेलकट व मसालेदार पदार्थ नियमित खाल्ल्यानेही वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. पिझ्झा, बर्गर, मॅगी, चायनीज पदार्थ यांसारखे फास्ट फूड चविष्ट असले तरी त्यामध्ये पोषक घटकांची कमतरता असते. जास्त मीठ, साखर आणि कॅलरीजमुळे हे पदार्थ शरीराला हानीकारक ठरतात.

गोड पदार्थांचे आकर्षण अनेकांना आवरता येत नाही. कोल्ड्रिंक्स, पेस्ट्री, केक किंवा चॉकलेटमध्ये असलेली साखर रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढवते आणि शरीरात चरबी जमा करते. हळूहळू ही चरबी लठ्ठपणाच्या स्वरूपात बाहेर दिसू लागते. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योग्य आहार आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयी आत्मसात करणे हाच एक उत्तम मार्ग आहे.

Weight Loss Tips
Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com