Trupti Khamkar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Trupti Khamkar: १२ तासाची शिफ्ट, पण काम फक्त अर्ध्या तास; अभिनेत्री तृप्ती खामकरने सांगितला 'क्रू' चित्रपटाच्या सेटवरील अनुभव

Trupti Khamkar :'क्रू' (Crew Movie) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री तृप्ती खामकरनेदेखील काम केले आहे.तृप्तीने तिला सेटवर मिळालेली वागणूक याबद्दल माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Actress Trupti Khamkar Share Experience On Crew Movie Set:

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन अशी स्टारकास्ट असलेला 'क्रू' (Crew Movie)चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री तृप्ती खामकरनेदेखील काम केले आहे. चित्रपटाच्या शुटिंगवेळी तृप्तीला मिळालेला वागणूक ही चांगली नसल्याचे तिने सांगितले आहे. याबाबत तिने एका मुलाखतीत माहिती दिली आहे.

चित्रपटाच्या शुटिंगवेळी माझ्यासोबत अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे मला प्रचंड वाईट वाटले. मला जवळपास १२ तासाचे काम होते. परंतु मला हे काम अर्ध्या तासातच पूर्ण करण्यास सांगितले. जेव्हा चित्रपटातील मुख्य कलाकारांचे काम पूर्ण व्हायचे. ते सेटवरुन निघून जायचे. त्यानंतर मला अभिनय करण्यास सांगितले. मी दिवसभर एका बाजूला उभी राहून माझे डायलॉग पाठांतर करायची. परंतु मला कधीच मुख्य कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली नाही. (Latest News)

तृप्तीने सांगितले की, 'मला स्क्रिप्टशिवाय डायलॉग दिले होते. जेव्हा मुख्य कलाकार त्यांचे काम पूर्ण करुन निघून जायचे. त्यानंतर आम्ही काम करायची. १२ तासाच्या शिफ्टमध्ये सर्व कॅमेरे फक्त मुख्य कलाकारांवर फोकस असायचे. मी बाजूला उभी राहून माझे डायलॉग पाठ करायची. शेवटच्या अर्ध्या तासात मला माझे काम करायला सांगायचे. त्यावेळी खूप वाईट वाटले. मी माझे काम अर्ध्या तासात संपवायची'.

'क्रू' चित्रपटात काम करायच्या अनुभवाबद्दल तृप्तीने सांगितले की, 'आम्ही सहाय्यक कलाकार कोणतेही चॅलेंज घेऊ शकतो. आणि पूर्ण करु शकतो. मला कोणत्याही प्रकारचे स्क्रिप्ट देण्यात आले नव्हते. मी जेव्हा बाजूला उभी राहायची तेव्हा संपूर्ण सीन व्यवस्थित बघायची. त्यामुळे मला लक्षात असायचे कोणता डायलॉग केव्हा बोलायचा आहे. माझ्याकडे थिएटरची पदव्युतर पदवी आहे. जेव्हा तुम्ही सेटवर ट्रेनिंग घेत असता तेव्हा या डिग्रीचे महत्त्व समजते. आपल्याला पूर्ण दिवस सेटवर अॅक्टिव राहावे लागते. सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. यामुळे तुम्ही बिना डायलॉग असातानादेखील चांगला परफॉर्मन्स करु शकतात. हे सर्व तुम्हाला सेटवर शिकता येते. हे सर्व मला या चित्रपटाच्या सेटवर शिकायला मिळाले आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT