महविकास आघाडीची स्क्रिप्ट वाचून महायुतीला आणि नेत्यांना बदनाम करण्याचे काम मनाेज जरांगे- पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांच्याकडून सुरू असल्याचा आराेप भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम (dhairyasheel kadam) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला. साम टीव्हीशी बाेलताना कदम यांनी महाविकास आघाडीवर (mahavikas aghadi) देखील टीका केली. (Maharashtra News)
भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण (maratha reservation) मिळवून दिलं. ते उच्च न्यायालयात टिकवलं. त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात ते टिकलं नाही. दुर्दैवाने महविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेले हे कुठेही नमूद केले जात नाही असेही कदम यांनी म्हटले.
आगामी काळात निवडणुका आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. महविकास आघाडीची स्क्रिप्ट वाचून महायुतीला आणि नेत्यांना बदनाम करण्याचे काम जरांगे पाटील यांच्याकडून सुरू आहे आणि हा प्रकार निंदनीय आहे असेही धैर्यशील कदम यांनी नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.