Salman Khan Offered Sonakshi Sinha Dabangg Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha Birthday : सलमान खानने 'दबंग'साठी सोनाक्षी सिन्हाकडे कोणती अट ठेवली होती ?, जाणून घ्या...

Sonakshi Sinha Birthday : सोनाक्षी खरंतर कॉस्च्युम डिझायनर होती. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण ती अभिनय क्षेत्रात कशी आली ? याबद्दल जाणून घेऊया...

Chetan Bodke

संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेबसीरिजमुळे सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चर्चेत आहे. आज सोनाक्षी सिन्हाचा ३७ वा वाढदिवस आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची ती मुलगी आहे. सोनाक्षीचा जन्म २ जून १९८७ रोजी झाला आहे. तिने बॉलिवूडमध्ये, सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातून पदार्पण केले आहे. सोनाक्षी खरंतर कॉस्च्युम डिझायनर होती. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण ती अभिनय क्षेत्रात कशी आली ? याबद्दल जाणून घेऊया...

सोनाक्षी सिन्हा हिला बालपणापासून जरीही अभिनयाची पार्श्वभुमी असली तरीही तिला अभिनयामध्ये फारशी आवड नव्हती. अभिनेत्री होण्यापूर्वी सोनाक्षी कॉस्च्युम डिझायनर होती. तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिने केव्हाही अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता. सोनाक्षी कॉस्च्युम डिझायनर असल्यामुळे ‘मेरा दिल लेके देखो’ या चित्रपटासाठी तिने कपडे डिझाइन केले होते. त्यावेळी सलमानने तिला फिट होण्याचा सल्ला दिला होता. तू फिट झाल्यानंतरच तुला मी बॉलिवूडमध्ये घेईल, असा त्याने सांगितलं. तिने हा सर्व किस्सा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितले होता.

ती म्हणाली, "सलमान खानने मला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. कारण तो मला त्याच्या चित्रपटामध्ये घेण्यासाठी खूपच उत्सुक होता. मी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माझी खूपच तब्येत होती. जेव्हा मी १८ वर्षांची होते, तेव्हा माझं वजन ९५ किलो होते. या चित्रपटासाठी मी माझे एकूण ३० किलो वजन कमी केले होते. त्यानंतरच सलमानने मला त्या चित्रपटामध्ये कास्ट केले." सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये 'दबंग' चित्रपटामध्ये डेब्यू केले असून त्यानंतर तिने 'रावडी राठौड', 'सन ऑफ सरदार', 'आर...राजकुमार', 'कलंक', 'लुटेरा', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' आणि 'मिशन मंगल'मध्ये काम केले. यातील तिचे अनेक चित्रपट हिट ठरले आहे, तर काही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT