Sonakshi Sinha News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा अचानक नेटकऱ्यांवर भडकली, नेमकं असं काय घडलं?

Sonakshi Sinha Heeramandi Web Series : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये आपल्या अभिनयाविषयी भाष्य केले आहे.

Chetan Bodke

संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हीरामंडी- द बझार’ वेबसीरीज सध्या चांगलीच प्रकाशझोतात आहे. या वेबसीरीजने अवघ्या काही दिवसांतच ओटीटीवर फार मोठा विक्रम मोडित काढला आहे. या वेबसीरीजच्या कथानकाचे, कलाकारांचे आणि सेटचे सध्या चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. अशातच सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या अभिनयाविषयी भाष्य केले आहे.

नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोनाक्षी म्हणाली की, "एक कलाकार म्हणून आपल्या खांद्यावर अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. आपल्याकडे लक्ष देण्यासाठी अनेक लोकं असतात. मला अनेक बिगबजेट चित्रपटांचा भाग बनण्याची संधी मिळत होती. तेव्हाच मला काही गोष्टी कळाल्या आणि त्यावर लोकं माझ्या कामावर लक्ष देऊ लागले."

सोनाक्षी मुलाखतीमध्ये पुढे म्हणाली, " मी 'अकिरा' चित्रपटात काम केल्यानंतर, माझ्या व्यक्तिरेखेत तुम्हाला खूप बदल जाणवलेला दिसेल. मी नेहमीच माझ्या बोलण्यावर ठाम राहते. मी आतापासून कधीही स्वत:ला माल म्हणून बोलून घेणार नाही. हे एक पाऊल आहे, जे प्रत्येकाने उचलायला हवे. असे खूप आहेत, जे तुमचा आदर करतात.

"जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये नवी होते, त्यावेळी मला कोणीही चित्रपटासाठी नाही म्हणत नव्हते. त्यामुळे मी त्यांना अनेक प्रोजेक्ट्सला नकार दिला होता. जसजसा आपल्याला आपल्या कामाचा अनुभव येत जातो, तसतसा आपल्याला आपल्या कामातील उणीवा, चुका समजत जातात. जसजसे लोकं आपल्याला नोटिस करतात, तसे ते आपल्याला आपल्या चुका सांगतात."

वेश्या महिलांवर आधारित वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा प्रमुख भूमिकेत आहे. जरीही नेटकरी वेबसीरीजला चुकांमुळे ट्रोल करत असले तरीही वेबसीरीजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT