Pranit Hatte News
Pranit Hatte NewsInstagram

Pranit Hatte : हॉटेलमध्ये एन्ट्री नाकारल्यामुळे तृतीयपंथीय अभिनेत्री संतापली, म्हणाली, "आम्ही इथे वायफळ किंवा घाणेरडंही काम करायला..."

Pranit Hatte News : अभिनेत्री प्रणिता हाटे काल एका कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये गेली होती. त्यावेळी तिने एका हॉटेलची बुकिंग केली होती. पण ती तृतीयपंथीय असल्यामुळे तिचं बुकिंग रद्द केले.

सध्या तृतीयपंथीयही समाजाच्या प्रवाहामध्ये येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तृतीयपंथीयही अनेक मोठमोठ्या हुद्द्यावर येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. झी मराठीवरील ‘कारभारी लयभारी’ मालिकेतील गंगा अर्थात अभिनेत्री प्रणित हांडे सध्या एका कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने काल सोशल मीडियावर एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री प्रणिता हाटे काल एका कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये गेली होती. त्यावेळी तिने तिथे एका हॉटेलचं राहण्यासाठी बुकिंग केलं होतं. पण ती तृतीयपंथीय असल्यामुळे तिचे हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले. हा सर्व प्रसंग तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ आणि इन्स्टा स्टोरी शेअर करत घडलेला प्रसंग सांगितला आहे.

Pranit Hatte Post
Pranit Hatte Post Instagram

प्रणितने तिच्या इन्टा स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती म्हणते, " मी एका कार्यक्रमासाठी नाशिकला आले होते. त्यावेळी तिथं मी एका हॉटेलमध्ये रुम बुक केली होती, पण अचानक माझं बुकींग रद्द केलं. माझं बुकिंग का रद्द केलं ? असा प्रश्न विचारला, त्यावेळी ते मला "तुम्ही तृतीयपंथी आहात, त्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये राहायला परवानगी नाही." असं ते म्हणाले. अशावेळी आम्ही कुठे जायचं? "

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रणित हांडेने घडलेला सर्व किस्सा सांगितला आहे. किस्सा सांगितल्यानंतर तिने यावर काय करता येईल? असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. व्हिडीओमध्ये प्रणिता म्हणाली, "माझ्यासारखे अनेक तृतीयपंथी आहेत जे कार्यक्रमासाठी किंवा कोणत्या कामासाठी किंवा काही कामानिमित्त बाहेर जातात. पण मला तुम्हाला इथे महत्त्वाची गोष्ट सांगायचीये की, आम्ही इथे कुठंलही चुकीचं काम करायला आलेलो नाहीत. वायफळ किंवा घाणेरडंही काम करायला आम्ही आलो नाही आहोत. ज्यामुळे आमची हॉटेल बुकिंग रद्द होईल." असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केलेली आहे. यावेळी व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने अनेक प्रश्नही उपस्थित केलेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com