Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Viral Wedding Card Saam TV
मनोरंजन बातम्या

Sonakshi And Zaheer Wedding Card : अखेर ठरलं! सोनाक्षी आणि जहीरचं वेडिंग कार्ड व्हायरल; लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांना पाळाव्या लागतील अटी शर्ती

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding Card: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या अफवा खोट्या आहेत, असं सांग लग्नाच्या चर्चांना ब्रेक दिला होता. पण अशातच सोनाक्षी आणि जहीरचं वेडिंग कार्ड व्हायरल झालं आहे.

Chetan Bodke

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड जहीर इकबाल येत्या २३ जून रोजी लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात होते. सोनाक्षीने या लग्नाच्या अफवा असल्याचेही सांगितले होते. आता अशातच सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता हे कपल लग्न करणार असल्याचं सिद्ध झाले आहे.

गेल्या अनेक काळापासून सोनाक्षी आणि जहीर एकमेकांना डेट करीत आहे. पण तरी सुद्धा हे कपल लग्नाची तारीख आपल्या चाहत्यांपासून लपवत होते. पण अशातच आता सोनाक्षी आणि जहीर यांचं वेडिंग कार्ड समोर आलं आहे. वेडिंग कार्डप्रमाणे, सोनाक्षी आणि जहीर येत्या २३ जूनलाच लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नसोहळ्याला सोनाक्षी आणि जहीरचे जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील बास्टियन रेस्टॉरंटमध्ये सोनाक्षी आणि जहीरचं लग्न पार पडणार आहे.

सोनाक्षीच्या विश्वसनीय मित्राने दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी आणि जहीरला हे लग्न पूर्णपणे सिक्रेट ठेवायचे आहे. त्यामुळे दोघांनीही लग्नाबद्दल कोणतीही उघडपणे माहिती दिलेली नाही. जरीही दोघांनी लग्नाविषयी माहिती उघडपणे सांगितली नसली तरीही त्यांनी लग्नाची तारीख आणि लग्नाच्या स्थळाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सोनाक्षीने लग्नाबद्दल कोणतीही माहिती सांगितली नसली तरीही लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सोनाक्षी लग्नाची तयारी करत होती. अभिनेत्रीने तिचे लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नामध्ये पाहुण्यांना ड्रेस कोडही असणार आहे. लग्नामध्ये पाहुण्यांनी लाल रंगाचे कपडे परिधान करु नयेत, असं पत्रिकेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सोनाक्षी आणि जहीर २३ जून रोजी सकाळी रजिस्टर मॅरेज करणार आहेत. तर संध्याकाळी नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या सोशल मीडियावर हे वेडिंग कार्ड व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये लग्नाची जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Halloween : हॅलोवीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

Mulher Fort History: ट्रेकिंगसाठी ठरेल परफेक्ट किल्ला! मुल्हेर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Ranji Trophy 2025: सर रवींद्र जाडेजा नाशिकच्या मैदानावर खेळणार, ऋतुराज काय रणनीती आखणार?

SCROLL FOR NEXT