Sonakshi Sinha Love Story: 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पार्टीत पहिली भेट, नंतर मैत्री आणि प्रेम; अशी आहे सोनाक्षी सिन्हाची लव्हस्टोरी

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Love Story: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अभिनेत्री आपला बॉयफ्रेंड झहीरसोबत लग्नागाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे.
Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Love Story
Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Love StorySaam Tv

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला दबंग गर्ल म्हणून ओळखले जाते. सोनाक्षी सिन्हा आपल्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांची मने जिंकत असते. सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षी लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड झहीरसोबत लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

सोनाक्षी आणि झहीरने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु हे दोघेही अनेकदा पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले आहे. त्यावरुन या दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या दोघांची लव्हस्टोरी एका पार्टीत सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सोनाक्षी- झहीरची लव्ह स्टोरी

सोनाक्षी आणि झहीरची पहिली भेट एका पार्टीत झाली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आयोजित केलेल्या एका पार्टीत या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. यानंतर आता हे दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षी आणि झहीर २३ जूनला लग्न करणार आहेत. मुंबईत हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Love Story
Actress Died: मुंबईत ३७ वर्षीय अभिनेत्रीनं संपवलं जीवन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर या दोघांनीही सलमान खानच्या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. सोनाक्षीने दबंग चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. तर २०१९ मध्ये नोटबुक या चित्रपटातून झहीरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Love Story
Hemangi Kavi: मालिकांच्या चढाओढीमुळे... हेमांगी कवीने सांगितले मालिकांच्या सुरुवातील शीर्षकगीत न दाखवण्याचे कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com