Relationship Tips : आयुष्यभर सिंगल रहा, मात्र अशा व्यक्तींना कधीच डेट करू नका; नंतर पश्चाताप होईल

Healthy Relationship Tips : रिलेशनमध्ये आल्यावर तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये पुढील गोष्टी दिसत असतील तर लगेचच त्याच्यापासून वेगळं व्हा. त्या व्यक्तीला डेट करू नका.
Healthy Relationship Tips
Relationship Tips Saam TV

कॉलेज किंवा ऑफिसमध्ये अनेक कपल छान आणि मस्त आयुष्य जगत असतात. त्यांना पाहून काही सिंगल व्यक्तींना देखील आपणही रिलेशनशीपमध्ये यावं असं वाटतं. मात्र अशा कारणांमुळे तुम्ही काही व्यक्तींना डेट करत असाल तर ते चुक आहे. रिलेशनमध्ये आल्यावर तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये पुढील गोष्टी दिसत असतील तर लगेचच त्याच्यापासून वेगळं व्हा.

Healthy Relationship Tips
Relationship Tips: तुमच्या पार्टनरला या गोष्टी कधीच सांगू नका; नात्यात येईल दुरावा

फक्त बोलण्यात प्रेम

काही व्यक्ती आपण किती प्रेम करत आहोत हे फक्त बोलण्यातून सांगत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांचे आपल्या पार्टनरवर प्रेम नसते. फक्त मोठ मोठ्या बाता करणाऱ्या व्यक्तीचं बोलणं ऐकूण ही व्यक्ती त्याच्या पार्टनरवर किती प्रेम करत असेल असं वाटतं. मात्र अशा व्यक्ती फक्त बोलतात, मात्र तसं वागत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींना डेट करू नका.

पास्ट न विसरणारी व्यक्ती

काही जण ब्रेकअप झालेलं विसरत नाहीत. त्या व्यक्तीला विसरण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमाला होकार देतात आणि आधीच्या पार्टनरला विसरण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामध्ये काही जण आपल्या एक्सला लगेचच विसरत नाहीत. त्यांना सतत एक्सची आठवण येते. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून या गोष्टी सतत जाणवतात. त्यामुळे तुम्ही देखील अशा व्यक्तीला डेट करत असाल तर आजच थांबा.

जे होईल ते पुढे पाहू

काही जण आपल्या पार्टनरला शेवटपर्यंत साथ देणे आणि लग्न करण्याचे वचन देणे यापासून पळ काढतात. लग्नाचं वचन देत नाहीत. पालकांना गोष्टी पटल्या तर पुढचं पुढे बघू जो पर्यंत जमेल तो पर्यंत एकत्र राहू अशी सुद्धा काहींची मानसिकता असते. आता तुमची मानसिकता देखील अशी असेल तर हे चूक आहे. अशी मानसिकता असलेली व्यक्ती कधीच तुमची होऊ शकत नाही.

रिस्पेक्ट न देणे

काही व्यक्ती आपल्या पार्टनशी खुप प्रेम करत आहोत असं सांगतात मात्र त्यांना रिस्पेक्ट देत नाहीत. शुल्लक गोष्टींवरून पार्टनरचं मन दुखावतात. सतत पार्टनरचा अपमान होईल असं वागतात. अशा व्यक्तींना डेट करू नका.

Healthy Relationship Tips
Relationship Tips: न बोलता प्रेम व्यक्त केल्याने नातं आणखी बहरेल; कसं ते जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com