ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (DMCCSL) प्रकरणात ईडीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी अर्चना कुटे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. PMLA, 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाकडून अर्चना कुटे यांना ७ मार्च २०२६ पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे.मे ते जुलै २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या FIR नोंद करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना १२ ते १४ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्याचा आरोप आहे. तपासात सुमारे २,४६७ कोटी रुपयांचा निधी कुटे ग्रुपशी संबंधित कंपन्यांना कर्जाच्या नावाखाली वळवल्याचा खुलासा आहे. आवश्यक कागदपत्रे, तारण किंवा निधीचा उद्देश नसताना व्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे. यापूर्वीच सुरेश कुटे यांना अटक करण्यात आली आहे. विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीकडून छापेमारी करत १,६२१.८९ कोटी रुपयांची चल-अचल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.