Shruti Haasan And Santanu Hazarika Break Up They Unfollow Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

Shruti Haasan And Santanu Hazarika Break Up : श्रुती आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका यांचं ब्रेकअप झालं आहे. तब्बल चार वर्षांचं यांचं नातं आता संपुष्टात आले आहे.

Chetan Bodke

Shruti Haasan And Santanu Hazarika Break Up They Unfollow

कमल हसन यांची लेक श्रुती हासन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्रुती आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका यांचं ब्रेकअप झालं आहे. तब्बल चार वर्षांचं यांचं नातं आता संपुष्टात आले आहे. श्रुती आणि शांतनूने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तेव्हापासून यांच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चा रंगलेल्या आहेत. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या श्रुती हासन आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका वेगळे झाले आहेत.

फिल्म इंडस्ट्रीतल्या ह्या स्टार कपलच्या ब्रेकअपच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. श्रुतीने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर शांतनूबरोबरचे फोटो शेअर केले होते, तेही तिने डिलीट केलेले आहेत. श्रुती आणि शंतनू यांच्यात काही वैयक्तिक समस्या होत्या, त्यामुळे त्यांनी एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. नेमका दोघांनीही अद्याप ब्रेकअपचं कारण सांगितलेलं नाही. (Bollywood)

गेल्या काही दिवसांपूर्वी श्रुती हसनने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. “हा एक उत्तम प्रवास होता. माझ्याबद्दल आणि लोकांबद्दल मला खूप काही शिकायला मिळाले,” असं त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं. श्रुती आणि शांतनू बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते. एकमेकांना काही दिवस डेट केल्यानंतर हे कपल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिले होते. कायमच हे कपल पापाराझींसमोर एकत्रही स्पॉट झाले होते. अनेकदा शांतनू आणि श्रुती सार्वजनिकपणे एकमेकांवरील प्रेम जाहीर करायचे. (Bollywood News)

श्रृती हसनच्या कामाबद्दल सांगायचे तर, श्रृती शेवटची 'सालार' मध्ये दिसली होती. तिच्यासोबत चित्रपटामध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिका होते. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरामध्ये, 700 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यासोबतच श्रृती 'सालार २'मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शांतनू हा एक प्रसिद्ध डूडल आणि मल्टीडिस्पलनरी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. त्याने रफ्तार, डिव्हाईन, ऋत्विजसोबत अनेक फेमस सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Nachnichi Bhakri Recipe : गावाकडे बनवतात तशी मऊ-लुसलुशीत नाचणीची भाकरी, वाचा परफेक्ट रेसिपी

Marathi Serial Off Air : "...One Last Time"; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीनं केली खास पोस्ट

iPhone युजर्ससाठी धक्का! Truecaller मधील कॉल रेकॉर्डिंग फीचर होणार बंद, बॅकअपसाठी 'असा' उपाय करा

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीची गायब तलवार सापडली; महिनाभरापासून गायब होती तलवार, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT