Actress Viral Video: बॉलिवूडमध्ये दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीनंतर, रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये अनेक स्टार्स सहभागी झाले होते. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरनचा तिचा पती आंद्रेई कोश्चीवला किस करतानाचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. श्रिया सरन आणि तिचा पती आंद्रेई कोश्चीव १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला उपस्थित होते. दोघांनी फोटो काढले आणि त्याच वेळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये श्रिया सरन तिच्या पतीसोबत लिक लॉक करताना दिसली. या सेलिब्रेशनमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक प्रमुख कलाकार आले होते. पण, दृश्यम अभिनेत्री श्रिया सरनने तिच्या पतीसोबत कॅमेऱ्यासमोर लिप लॉक केल्यामुळे ती अधिक चर्चेत आली आहे. दिवाळी पार्टीसाठी श्रियाने सोनेरी साडी आणि आकर्षक ब्लाउज परिधान केला होता, तर तिच्या पतीने क्रीम रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता. या कपलचा रोमँटिक क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या स्टार्सची उपस्थिती
बॉलिवूडचे आवडते कपल, हृतिक रोशन आणि सबा आझाद हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते, त्यांनी हातात हात घालून स्टायलिश एन्ट्री केली. हृतिक काळ्या सॅटिन शर्ट आणि मॅचिंग ट्राउझर्समध्ये दिसला, तर सबाने भरतकाम केलेल्या सोनेरी-बेज शरारा परिधान केला होता.
या कपलचा लूक व्हायरल
बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या कपलपैकी एक, पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुलकितने इंडो-वेस्टर्न आउटफिट परिधान केला होता, तर कृती ऑफ-व्हाइट साडी आणि डीप-नेक डिझायनर ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा, तिचा पती झहीर इक्बाल देखील यावेळी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.