Shalini Pandey SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shalini Pandey : कपडे बदलताना व्हॅनिटीत अचानक दिग्दर्शक आला अन्...; अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा

Shalini Pandey Share Bad Experiences : शालिनी पांडेने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिच्यासोबत घडलेला एक वाईट अनुभव शेअर केला आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey) कायमच आपल्या दमदार अभिनय आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने आपल्या चित्रपटाने साऊथ इंडस्ट्री गाजवली आहे. आता ती बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे. शालिनी पांडेचा मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आता मात्रा शालिनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

शालिनी पांडेने आपल्या करिअरच्या सुरूवातीचा तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. एका मिडिया मुलाखतीत तिने साऊथ दिग्दर्शकाबद्दल एक धक्कादायक किस्सा शेअर केला. शालिनीने म्हणाली की, "मी काम करताना माझ्या वाट्याला फारसे चांगले पुरुष आले नाही. मी पडद्यावर , पडद्याबाहेर आणि टीममध्ये असताना देखील काही भयानक माणसांसोबत काम केले आहे. खूप वाईट अनुभव मला आले आहेत. "

पुढे शालिनीने म्हणाली, "मला कोणतीही फिल्मी बॅकग्राउंड नसल्यामुळे यासर्व गोष्टी कशा हाताळायच्या असतात मला माहित नव्हते. एकदा मी साऊथ चित्रपट करत होते. तेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये माझे कपडे बदलत होते. तेव्हा चित्रपटाचा दिग्दर्शक दार नॉक केल्याशिवायच माझ्या व्हॅनिटीमध्ये घुसला आणि त्याला पाहताच मी घाबरले. त्यानंतर मी त्या दिग्दर्शकाला खूप ओरडले."

शेवटी शालिनीने म्हणाली, "त्यानंतर मला सेटवरच्या लोकांनी सांगितले की मला त्याच्यावर ओरडायला नको होतो. तेव्हा मी फक्त 22 वर्षांची होते. पण मी नवीन असले तर ही आत यायची पद्धत नाही आहे. तुम्ही लोक दार ठोठावल्याशिवाय आत येऊ शकत नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT