Samantha Ruth Prabhu yandex
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu: १५ मोठ्या ब्रँडना नकार, कोट्यवधींचं नुकसान; पण, समांथाला आजही नाही स्वतःच्या निर्णयांवर पश्चात्ताप

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समांथा रूथ १५ वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. या अभिनेत्रीला तिच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.

Shruti Vilas Kadam

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की तिने आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी १५ ब्रँड अँडोर्समेंट्सना नकार दिला होता. यामुळे तिला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले, मात्र तिने या निर्णयाचा कोणताही पश्चाताप नाही, असे तिने स्पष्ट केले.

सामंथा काही काळापूर्वी मायोसिटिस या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त असल्याचे जाहीर झाले होते. या आजारामुळे शरीरात सूज येते आणि थकवा जाणवतो. उपचारासाठी तिला काही काळ अभिनयापासून आणि सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागले. या काळात तिचे अनेक ब्रँड करार रद्द करण्यात आले किंवा तिने स्वतःहून त्यांना नकार दिला.

तिच्या म्हणण्यानुसार, या काळात तिला स्वतःची काळजी घेणे, ध्यानधारणा, आणि उपचार यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक वाटले. “लोक विचारतात की इतकं सगळं गमावल्यावर तुला वाईट नाही वाटलं का? पण खरं सांगायचं तर मला अतिशय समाधान मिळालं आहे. मी आता शांत आहे, माझ्या आतल्या आवाजाशी जुळले आहे,” असे ती म्हणाली.

सध्या सामंथा 'सिटाडेल: इंडिया' या वेब सीरीजमध्ये वरुण धवनसोबत झळकली होती. तसेच, तिने आपले हेल्थ ब्रेक संपवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. तिचा हा प्रामाणिक आणि धाडसी निर्णय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुकास्पद ठरत आहे. अनेक महिला आणि तरुणींना तिच्या या निर्णयातून प्रेरणा मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT