Amitabh Bachchan: 'मी जातोय...'; अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चिंता; काय आहे नेमकं कारण?

Amitabh Bachchan Post: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. मात्र नुकतीच त्यांनी केलेली एक रहस्यमय पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
Amitabh Bachchan Smoking
Amitabh BachchanSAAM TV
Published On

Amitabh Bachchan Post: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. मात्र नुकतीच त्यांनी केलेली एक रहस्यमय पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. "मी जातोय... वेळ आली आहे..." असा संदेश त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता आणि कुतूहल निर्माण झालं आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी अगदी थोडक्यात, "I am going… it’s time to go…" असे लिहिले आणि चाहत्यांना मोठं आश्चर्याचा धक्का दिला. अमिताभ बच्चन यांनी कोणत्याही विशिष्ट गोष्टीचा उल्लेख केलेला नसल्याने, ही पोस्ट त्यांच्या निवृत्तीबाबत आहे की आरोग्याच्या कारणामुळे आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Amitabh Bachchan Smoking
Aamir khan: 'सितारे ज़मीन पर'साठी आमिर खान आणि जेनेलिया डिसोझा एकत्र; नव्या गाण्याने शूटिंगला सुरुवात

सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला असून, काहींनी भावनिक प्रतिक्रिया देत "कृपया तुम्ही असंच आमच्यासोबत राहा" अशी विनंतीही केली आहे. काही चाहत्यांनी अंदाज बांधला की कदाचित त्यांनी एखाद्या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा. परंतु यावर अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

Amitabh Bachchan Smoking
Mumbai Hidden Shopping Places: शॉपिंगसाठी जास्त पैसे नाहीत? मग मुंबईतील 'या' हिडन मार्केटला नक्की भेट द्या..!

अमिताभ बच्चन सध्या काही नव्या चित्रपटांमध्ये काम करत आहेत आणि 'कौन बनेगा करोड़पती' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या सिझनचीही तयारी करत आहे. त्यामुळे त्यांनी टाकलेली ही पोस्ट नक्की कशाबद्दल आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तरीही त्यांच्या पुढील स्पष्टीकरणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com