Jaaved Jaaferi: जावेद जाफरीचे एक्स अकाउंट हॅक; चाहत्यांना दिला रिपोर्ट करण्याचा सल्ला

Jaaved Jaaferi X Account hack: प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन जावेद जाफरीचे अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खाते हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Jaaved Jaaferi X Account hack
Jaaved Jaaferi X Account hackSaam tv
Published On

Jaaved Jaaferi X Account hack : प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन जावेद जाफरीचे अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खाते हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याने स्वतः त्याच्या दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत ही माहिती दिली असून, आपल्या सर्व चाहत्यांना त्या खात्यावरून होणाऱ्या कोणत्याही पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

जावेद जाफरी यांनी सांगितले की, त्याचे X अकाउंट पूर्णपणे हॅक झाले असून, त्याला त्या अकाउंटवर कोणताही अ‍ॅक्सेस मिळत नाही. त्यामुळे त्या खात्यावरून जर काही अनोळखी, अयोग्य किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट आल्यास, तर त्याकडे दुर्लक्ष करावे. त्याने चाहत्यांना विनंती केली आहे की, त्यांनी त्या अकाउंटला रिपोर्ट करावे, जेणेकरून X त्यावर लवकर कारवाई करू शकेल.

Jaaved Jaaferi X Account hack
Khatron ke Khiladi 15: 'खतरों के खिलाडी' संकटात! रोहित शेट्टी नाराज, निर्मात्यांची शोमधून घेतली माघार

या घटनेमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी जावेद जाफरीच्या हॅक झालेल्या खात्याविरुद्ध रिपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. सायबर सुरक्षेबाबत जागरूक असलेल्या अनेकांनी या घटनेवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरक्षा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Jaaved Jaaferi X Account hack
Akshay Kumar On Jaya Bachchan: 'जर त्या म्हणत असतील तर...', जया बच्चनच्या टिपणीवर अक्षय कुमारचा टोला

जावेद जाफरी त्याच्या विनोदी शैलीसाठी आणि तल्लख अभिनयासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर तो सातत्याने सक्रिय राहून समाजिक विषयांवर मतप्रदर्शन करत असतात. त्यामुळे त्याच्या X अकाउंटचे हॅक होणे ही केवळ वैयक्तिक हानी नसून, समाजिक स्तरावरही चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे सायबर पोलिस आणि X कडून लवकरच योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com